श्रावण घेवड्याची भाजी (French Beans): श्रावण घेवड्याची वा फरसबीची भाजी बनवतांना घेवडा कोवळा वापरावा म्हणजे भाजी छान होते. ह्या भाजीमध्ये शेंगदाणे कुट वापरल्यामुळे भाजी चवीस्ट लागते.
श्रावण घेवड्याची भाजी बनवण्यासाठी वेळ: २५ मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य :
२५० ग्राम श्रावण घेवडा/फरसबी
१ छोटा कांदा (बारीक चिरून)
३-४ हिरव्या मिरच्या
१ टे स्पून शेंगदाणे कुट
साखर व मीठ चवीने
फोडणीसाठी
१ टे स्पून तेल
१ टी स्पून मोहरी
१ टी स्पून जिरे
१/४ टी स्पून हिंग
६-७ कडीपत्ता पाने
१/४ टी स्पून हळद
कृती
श्रावण घेवडा धुवून चिरून घ्या, भाजी चिरून घेतांना लांबट चिरावा म्हणजे दिसायला पण छान दिसतो,
कढई मध्ये तेल गरम करून मोहरी, जिरे, हिंग, कांदा, हिरवी मिरची, कडीपत्ता, हळद घालून २ मिनिट परतून घ्या मग त्यामध्ये मीठ व चिरलेला श्रावण घेवडा घालून १/४ कप पाणी घाला. कढई वर झाकण ठेवा व झाकणावर थोडे पाणी घालून मंद विस्तवावर भाजी ८-१० मिनिट शिजवून घ्या. भाजी तील पाणी पूर्ण आतून देवू नका मग त्यामध्ये खोवलेला नारळ, साखर घालून मिक्स करून एक मिनिट भाजी परतून घ्या.
गरम गरम भाजी चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर सर्व्ह करा.
The English language version of the Recipe for Farasbi Bhaji or Shravani Ghevada Chi Bhaji can be seen in this – Article