सुरणाची भाजी (Yam) : सुरणाची सब्जी ही चवीला खूप स्वादिस्ट व रुचकर लागते. ही भाजी बनवायला पण अगदी सोपी आहे व पौस्टिक पण आहे. सुरणामध्ये प्रोटीन, लोह, व जीवनसत्व “अ” असते. सुरण नेहमी पांढरे वापरावे. लाल सुरण हे खाजरे असते. म्हणून नेहमी पांढरे सुरण वापरावे.
सुरणाची भाजी (Yam) बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य :
१/२ किलो सुरण (पांढरे)
३-४ आमसुले
मीठ चवीने
फडणी साठी
१ टे स्पून तेल
१ टी स्पून मोहरी
४-५ लाल सुक्या मिरच्या
१ टे स्पून उडीदडाळ
वाटण्यासाठी
१/२ कप नारळ (खोवून)
१ टी स्पून जिरे
कोथंबीर सजावटीसाठी
कृती :
सुरण धुवून साफ करून त्याचे लांबट उभे तुकडे करावेत. नारळ व जिरे जाडसर वाटून घ्यावे.
एका भांड्यात पाणी उकळून त्यामध्ये आमसूल व मीठ घालून सुरणाच्या फोडी घालून ५-७ मिनिट मंद विस्तवावर शिजवून घ्यावे. (सुरण आमसुल व मिठाच्या उकडल्यामुळे सुरणाचा खाजरे पणा नाहीसा होतो.)
एका कढई मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, लाल मिरच्या, उडीदडाळ, मीठ घालून सुरणाच्या शिजवलेल्या फोडी घालून भाजी परतून घ्यावी मग त्यामध्ये वाटलेले खोबरे घालून परत भाजी थोडी परतून घ्यावी.
कोथंबीरीने भाजी सजवून चपाती बरोबर सर्व्ह करावी.
The English language version of the Suranachi Bhaji recipe is published in this – Article