वरयाच्या पीठाचे डोसे : वरयाच्या पीठाचे [Vrat ke Chawal in Hindi and barnyard Millet in English डोसे हे उपासाच्या दिवशी बनवतात. ह्या डोश्या बरोबर उपासाची बटाट्याची भाजी छान लागते. वरयाच्या पीठाच्या डोश्या बरोबर चटणी पण चांगली लागते. हे डोसे छान कुरकुरीत होतात.
साहित्य :
३ वाट्या वरयाचे तांदूळ
१ मध्यम आकाराची काकडी
२ हिरव्या मिरच्या
१ टी स्पून जिरे
मीठ चवीने
तेल डोश्या साठी
कृती :
वरयाचे तांदूळ धुवून घ्या. मग वरयाचे तांदूळ, हिरवी मिरची, जिरे, मीठ व थोडेसे पाणी पाणी घालून मिक्सरमध्ये वाटून घ्या. काकडी सोलून किसून घेवून वाटलेल्या पिठात घालून मिक्स करून डोश्याच्या पीठा प्रमाणे पीठ तयार करावे.
नॉन स्टिक तवा गरम करून १ टी स्पून तेल लावून डावाने डोसा घालून बाजूनी थोडेसे तेल सोडावे. दोन्ही बाजूनी डोसा भाजून घावा व बटाट्याच्या भाजी बरोबर अथवा चटणीबरोबर सर्व्ह करावा.