गव्हाच्या पिठाचा शिरा Wheat Atta Halwa-Sheera : गव्हाच्या पिठाचा शिरा किंवा ह्याला आटे का शिरा सुद्धा म्हणतात. हा शिरा चवीला खूप छान लागतो. गहू हा तब्येतीला चांगला असतो. त्यामुळे गव्हाच्या पिठापासून शिरा बनवलेला किती पौस्टिक आहे. त्यामध्ये साजूक तूप, दुध व काजू-बदाम घातल्यामुळे त्याची टेस्ट अजूनच चांगली होते. तसेच तो बनवायला पण सोपा व लवकर होणारा आहे. हा शिरा आपण नास्त्याला किंवा सणाला सुद्धा बनवू शकतो.
साहित्य :
१ कप गव्हाचे पीठ
१ कप दुध व १/४ कप पाणी
१/२ कप साखर
१/४ कप साजूक तूप
१ टी स्पून वेलचीपूड
थोडे काजू-बदाम तुकडे
कृती :
एका कढईमधे तूप गरम करून गव्हाचे पीठ घालून बदामी रंगावर मंद विस्तवावर भाजून घ्या. पीठ भाजून झाल्यावर एका प्लेट मध्ये काढून ठेवा. कढई मध्ये दुध व पाणी मिक्स करून एक उकळी आणा व उकळी आल्यावर भाजलेले पीठ घालून मंद विस्तवावर २-३ मिनिट शीजुवून घ्या. मग त्यामध्ये साखर, वेलचीपूड घालून मिक्स करून शिरा थोडासा घट्ट होई परंत शिजवून घ्या. पाहिजे असेल तर थोडे तूप अजून घाला. (जर शिरा गोडीला थोडा जास्त पाहिजे असेल तर अजून थोडी साखर घाला.)
सर्व्ह करण्याच्या आगोदर काजू-बदाम तुकडे घालून गरम-गरम सर्व्ह करा.
The English language version recipe for the Gehu ke Aate Ka Halwa is published in this – Article