महाराष्ट्रात आश्विन वद्य ११ पासून दिवाळी चालू होते. रोज पहाटे लवकर उठून आंगण साफ करून सडा घालावा व रांगोळी काढावी अभ्यंग स्नान करावे. दिवाळी मध्ये घरोघरी अगदी आनंदी वातावरण ठेवावे. पूजा अर्चा करावी.
वसुबारस : आश्विन वद्य १२ ह्या दिवशी वसुबारस येते. त्यादिवशी घरी पुरणपोळी बनवतात व संध्याकाळी गाईची व वासराची पूजा करून त्यांना केळीच्या पानावर पोळी ठेवून खायला घालतात. आपल्या घरी लक्ष्मी नेहमी नांदत रहावी ह्या मागचा हेतू होय. ह्या दिवसापासून दारासमोर रांगोळी घालून दिवा लावतात.
वसुबारस : आश्विन वद्य १२ ह्या दिवशी वसुबारस येते. त्यादिवशी घरी पुरणपोळी बनवतात व संध्याकाळी गाईची व वासराची पूजा करून त्यांना केळीच्या पानावर पोळी ठेवून खायला घालतात. आपल्या घरी लक्ष्मी नेहमी नांदत रहावी ह्या मागचा हेतू होय. ह्या दिवसापासून दारासमोर रांगोळी घालून दिवा लावतात.
धनत्रयोदशी : आश्विन वद्य १३ ह्या दिवशी धनत्रयोदशी असते. ह्यादिवशी आपल्या धनाची पूजा करतात. नवीन हिशोबाच्या वह्या खरेदी करतात. पाच दिव्यांची पूजा करून धने व गुळ पूजेसाठी ठेवतात.
नरकचतुर्दशी : आश्विन वद्य १४ : ह्या दिवशी नरकचतुर्दशी अभ्यंग स्नान करून देवाची पूजा करून आपण जो फराळ बनवला आहे तो प्रथम देवा पुढे ठेवावा. मगच घरात व शेजारी पाजारी आपले आप्त वगैरेना फराळ द्यावा.
लक्ष्मी पूजन : ह्या दिवशी आपल्या लक्ष्मीची ज्यावेळेस मुहूर्त असेल तेव्हा पूजा करावी. पूजेसाठी साळीच्या लाह्या व बात्तसे ठेवावेत. घरात लक्ष्मीची पावले काढावीत. व मनोभावे पूजा करावी.
गुडी पाडवा : गुडी पाडवा ह्या दिवशी गोड-धोड करतात. हा दिवस तर महिलांचा अगदी आवडतीचा आहे. कारण ह्या दिवशी पतीदेवांना ओवाळून चांगली भेट वस्तू अगदी हक्काने मागितली जाते. व पतीदेव ती भेट वस्तू अगदी आनंदाने देतात. ह्या दिवसापासून मराठी लोकांचे नवीन वर्ष चालू होते.
भाऊबीज : हा दिवस बहिणीचा असतो. ह्या दिवशी बहीण भावाला आपल्या घरी जेवायला बोलावते. व भाऊ आपल्या लाडक्या बहिणी साठी तिच्या आवडतीची भेट वस्तू तिला भेट म्हणून देतो.
अशी ही महाराष्ट्रातील मराठी लोकांची आगळी वेगळी दिवाळी अथवा दीपावली आहे. ही दिवाळी तुम्हा सर्वाना आनंदाची व सुख-समृद्धीची जावो हीच देवा जवळ प्रार्थना करते. || शुभ दीपावली ||