दुधीभोपळा औषधी गुणधर्म : (Bottle Gourd) दुधीभोपळा ह्याचे बरेच औषधी गुणधर्म आहेत. दुधीचे सेवन केल्यास आपल्या मस्तकाची उष्णता दूर होते. व आपल्या मेंदूला शक्ती मिळते व तरतरी येते.
दुधीभोपळा पचनास थोडा जड आहे व शक्तीदायक आहे. जे अशक्त रुग्ण आहेत त्यांच्या साठी दुधी हा उत्तम आहे. ज्याची प्रकृती उष्ण आहे त्याच्या साठी दुधी अगदी उत्तम आहे.
दुधी हृदयास हितकारी आहे, पिक्त व कफनाशक रुची उत्पन्न करणारा आहे. जुलाबा वरती दुधीभोपळा हा गुणकारी आहे. व थंड सुद्धा आहे.
दुधीभोपळ्या पासून आपल्याला भाजी, हलवा, भजी, थालपीठ, पराठा बनवता येतो. तसेच एक मुख्य म्हणजे दुधीच्या पासून त्याचा जूस म्हणजेच रस बनवला जातो तो आपल्या तब्येतीला खूप चांगला आहे. दुधीभोपळ्याचा कोणताच भाग वाया जात नाही म्हणजे त्याच्या सालीची चटणी चांगली होते. त्याच्या बिया औषध बनवण्यासाठी वापरतात.
लौकीची भाजी बनवताना त्यामध्ये भिजवलेली चणाडाळ घालावी म्हणजे भाजी चवीस्ट लागते. तसेच दुधीचा हलवा स्वादिस्ट लागतो. ह्याचे थालपीठ पण छान खमंग लागते.
असे आहेत दुधीभोपळा/ लौकीचे औषधी गुणधर्म.