गाजर-शेवयाची खीर Carrot Seviyan Kheer: आपण गाजर वापरून खीर बनवतो. तसेच शेवयांची पण खीर बनवतो. हेच जर आपण गाजर व शेवया दोन्ही मिक्स करून खीर बनवली तर एक चवीस्ट खीर बनते. ह्याची टेस्ट पण छान लागते. तसेच बनवायला पण सोपी व कमी वेळात बनते. गाजरामुळे रंगपण चांगला येतो.
साहित्य :
१ कप केशरी गाजर (कीस)
१ कप शेवया
१/२ लिटर दुध
१/४ कप खवा
१/४ कप साखर
१ टी स्पून वेलचीपूड
१ टे स्पून साजूक तूप
थोडे काजू-बदाम तुकडे
कृती : कढईमध्ये १/२ टे स्पून तूप गरम करून त्यामध्ये शेवया गुलाबी रंगावर भाजून घ्या व बाजूला काढून ठेवा. मग बाकीचे तूप घालून गाजर थोडे परतून घ्या. व त्यामध्ये थोडेसे दुध घालून शिजवून घ्या. मग शेवया घालून थोड्या शिजवून घ्या, बाकीचे राहिलेले दुध व खवा घालून एक उकळी आणा व त्यामध्ये साखर व वेलची पूड घालून मिक्स करून ५ मिनिट मंद विस्तवावर गरम करून घ्या.
ही खीर गरम किंवा थंडपण छान लागते.