कॉलिफ्लॉवर पराठा : कॉलिफ्लॉवर पराठा हा मुलांना शाळेत जातांना डब्यात देता येईल तसेच नाश्त्याला सुद्धा बनवता येतो. फुल गोबीचा पराठा खूप टेस्टी लागतो. हा बनवायला पण खूप सोपा आहे. मुले कॉलिफ्लॉवरची भाजी खात नसतील तर अशा प्रकारचा पराठा बनवा.
साहित्य :
आवरणासाठी :
२ कप गव्हाचे पीठ (Wheat Flour)
१ टे स्पून तेल (Vegetable Oil)
मीठ चवीने (Salt)
सारणासाठी : (Filling)
१/२ किलो ग्राम कॉलिफ्लॉवर (किसून)
१ मोठा कांदा (Onion)
७-८ कडीपत्ता (Curry Leaves)
३-४ हिरव्या मिरच्या (Green Chilies)
१ छोटे लिंबू रस (Limbu Juice)
१/४ कप कोथंबीर (Coriander)
मीठ चवीने (Salt)
फोडणी साठी
१ टे स्पून तेल (Oil)
१ टी स्पून मोहरी (Mustard Seeds)
१ टी स्पून जिरे (Cumin Seeds)
१/२ टी स्पून हिंग (Asafoetida)
१ टी स्पून हळद (Turmeric Powder)
कृती : गव्हाचे पीठ, तेल, मीठ मिक्स करून पीठ माळून घ्या. त्याचे लिंबा एव्ह्डे गोळे करून घ्या.
कॉलिफ्लॉवरचे तुरे पाण्यात घालून मग किसून घ्या. कांदा व कोथंबीर चिरून घ्या. मिरची बारीक चिरून घ्या.
एका कढईमधे तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग, कडीपत्ता, कांदा व हिरवी मिरची घालून थोडे परतून घ्या. मग त्यामध्ये हळद, मीठ व किसलेला कॉलिफ्लॉवर घालून मिक्स करून घेवून कढईवर झाकण ठेवून त्यावर पाणी घालून ५-७ मिनिट भाजी शीजु द्या. नंतर त्यामध्ये लिंबू रस, कोथंबीर घालून २ मिनिट परतून घ्या.
मग एक गोळा घेवून पुरी सारखा त्यावर एक टे स्पून कॉलिफ्लॉवरच्या भाजीचे सारण ठेवून परत त्यावर दुसरी पुरी ठेवून कडेनी दाबून घ्यावी व पराठा ल्तून घ्यावा.
तवा तापवून थोडेसे तेल घालून पराठा दोन्ही बाजूनी पराठा भाजून घ्यावा.
गरम-गरम पराठ्या वर तूप किंवा लोणी घालून सॉस बरोबर सर्व्ह करावे.
The English language version of the Cauliflower Paratha is published in this –Article