कॉली फ्लॉवरचा उपमा Cauliflower cha Upma) : कॉली फ्लॉवरचा उपमा उपमा हा नाश्त्याला किंवा लहान मुलांना शाळेत जातांना डब्यात देता येईल. हा उपमा बनवायला सोपा व लवकर होणारा आहे. उपमा बनवतांना त्यामध्ये कांदा, आले-लसूण पेस्ट, लिंबू, कोथंबीर घातल्यामुळे चव खूप छान येते.
साहित्य :
५०० ग्राम कॉली फ्लॉवर (Cauliflower)
2-3 हिरव्या मिरच्या (Green Chilies)
१” आले तुकडा (Ginger)
४-५ पाकळ्या लसूण (Garlic)
२ मध्यम आकाराचे कांदे (Onion बारीक चिरून)
१ टी स्पून लिंबू रस
मीठ चवीने (Salt)
कोथंबीर सजावटीसाठी (Coriander)
१/४ कप नारळ (Coconut खोवून)
फोडणी साठी
१ टे स्पून तेल (Oil)
१/४ टी स्पून हळद (Termeric Powder)
कृती : कॉली फ्लॉवरचे तुरे भांड्यात पाणी घेवून ५ मिनिट भिजत ठेवा. मग किसणीने किसून घ्या. हिरवी मिरची, आले-लसूण वाटून घ्या.
कढई मध्ये तेल गरम करून कांदा गुलाबी रंगावर परतून घ्या. मग हळद हिरवी मिरची, आले-लसूण पेस्ट घालून १-२ मिनिट परतून घेतल्यावर किसलेला कॉली फ्लॉवर घालून मिक्स करा व कढईवर झाकण ठेवून त्यावर पाणी घालून ५-७ मिनिट शिजवून घ्या. नंतर त्यामध्ये मीठ चवीने घालून, लिंबू रस व साखर चवीने घालून मंद विस्तवावर २ मिनिट उपमा परतून घ्या.
सर्व्ह करतांना वरतून कोथंबीर, खोवलेला नारळ घालून सर्व्ह करा. आवडत असेलतर वरतून थोडी बारीक शेव घालावी.
The English language version of the Cauliflower cha Upma recipe is published in this – Article