दुधी भोपळा पराठा/ थालपीठ : दुधीभोपळ्यालाच लॉकी म्हणतात. दुधी भोपळा हा पौस्टिक आहे. त्याची थालपीठ किंवा पराठे बनवले तर अगदी चवीस्ट लागतात. दुधी भोपळ्याचा पराठा बनवायला अगदी सोपा आहे. ह्यामध्ये थोडे बेसन व बडीशेप घातली आहे त्यामुळे ह्याची चव चांगली लागते. लहान मुलांना शाळेत जातांना डब्यात द्यायला छान आहे.
साहित्य : १ कप दुधीभोपळा (किसून)
२ कप गव्हाचे पीठ
२ टे स्पून बेसन
१ १/२ टी स्पून लाल मिरची पावडर
१ टी स्पून बडीशेप
१/४ टी स्पून हळद
१/४ टी स्पून हिंग
१ टी स्पून धने-जिरे पावडर
१ टे स्पून तेल मीठ चवीने
तेल पराठा अथवा थालीपीठ भाजण्यासाठी
कृती : दुधीभोपळा धुवून त्याची साले काढून किसून घ्या. मग त्यामध्ये गव्हाचे पीठ, बेसन, लाल मिरची पावडर, बडीशेप, हळद, हिंग, धने-जिरे पावडर, मीठ व तेल मिक्स करून थोडेसे पाणी वापरून पीठ मळून घ्या. पराठ्याचे पीठ १०-१५ मिनिट तसेच ठेवा.
तवा गरम करायला ठेवा व पीठाचे लहान गोळे बनवून चपाती प्रमाणे लाटून तेलावर भाजून घ्या किंवा थालीपीठ प्रमाणे थोडे सैल पीठ ठेवून कापडावर थापून मग तव्यावर तेल घालून दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजून घ्या.
गरम गरम पराठा तूप अथवा बटर घालून टोमाटो सॉस बरोबर सर्व्ह करा.
The English language version of the Dudhi Bhopla Paratha is published in this – Article