गोडे शंकरपाळे : (Sweet or Godi Shankarpali) दिवाळी म्हटले ही शंकरपाळी ही हवीच. मराठी लोकांची ही लोकप्रिय डीश आहे. लहान मुलांना तर खूप आवडतात.फक्त दिवाळीलाच नाही आपण इतर वेळेस सुद्धा बनवतो ह्या गोड शंकरपाळ्या चहा बरोबर छान लागतात. गोड्या शंकरपाळ्या जेव्ह्ड्या क्रिस्पी बनतील तेव्हड्या छान लागतात. गोड शंकरपाळ्या बनवण्यासाठी मी गव्हाचे पीठ व मैदा वापरला आहे. त्यामुळे त्या पौस्टिक तर आहेतच व चवीला पण स्वादीस्ट लागतात.
गोडे शंकरपाळे बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: १/२ किलोग्राम बनतात
साहित्य :
२ कप मैदा (Refined Flour)
१ कप गव्हाचे पीठ (Wheat Flour)
१ कप पिठीसाखर (Grounded Sugar)
१/४ कप तेल किंवा तूप (मोहन घालण्यासाठी) (Vanaspati Ghee)
१ टी स्पून मीठ (Salt)
१ चिमुट खायचा सोडा (Soda-bi Carb)
१ कप दुध (Milk)
तूप गोड शंकरपाळी तळण्यासाठी (वनस्पती) (Vanaspati Ghee)
कृती : मैदा, गव्हाचे पीठ, मीठ व बेकीग सोडा मिक्स करून चालून घ्या. साखर मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. मोहन घालण्यासाठी तेल गरम करून घ्या.
एका परातीत तूप व पिठीसाखर मिक्स करून चांगली फेसून घ्या. मग त्यामध्ये चाललेला मैदा हळूहळू मिक्स करून घ्या. मिक्स केल्यावर त्यामध्ये १ कप दुध घाला व हलक्या हाताने मिक्स करा. जसे लागेल तेव्हडे पाणी वापरून पीठ थोडे घट्ट मळून घ्या. थोडा वेळ पीठ तसेच बाजूला ठेवा मग थोडेसे कुटून घ्या. त्याचे एक सारखे गोळे बनवा.
एक गोळा घेवून त्याची गोल पोळी लाटून नक्षीच्या कटरने शंकरपाळ्या कापून घ्या.
कढई मध्ये तूप गरम करून त्यामध्ये शंकरपाळ्या गुलाबी रंगावर तळून घ्या.
टीप : शंकरपाळी तळताना प्रथम विस्तव मोठा करा मग शंकरपाळ्या झाऱ्याने हलवून मग मंद विस्तवावर तळून घ्या.
शंकरपाळ्या तळल्यावर एका प्लेटमध्ये काढून मग पेपरवर थंड करायला ठेवा. थंड झाल्यावर प्लास्टिकच्या पिशवी मध्ये घट्ट झाकणाच्या डब्यात ठेवा.