गुलकंद लाडू Gulkand- Rose Petal Jam: हे लाडू चवीला फार छान लागतात. गुलकंद लाडू मध्ये खवा व गुलकंद चे सारण भरले आहे त्यामुळे जरा नवीन प्रकार आहे. तसेच रोझ इसेन्स मुळे सुगंध पण छान येतो. आपल्या दिवाळी फराळा मध्ये हा नवीन प्रकार आहे.
गुलकंद लाडू बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: १५ मध्यम आकाराचे लाडू
साहित्य :
२ कप बारीक रवा
३/४ कप तूप (साजूक तूप + वनस्पती तूप)
१ १/२ कप साखर
२-३ थेंब रोझ इसेन्स
सजावटीसाठी केसर कड्या व ड्रायफ्रुट
सारणा साठी :
३/४ कप खवा,
२ टे स्पून गुलकंद,
थोडे काजू-बदाम जाडसर पूड व किसमिस
कृती : कढई मध्ये तूप गरम करून त्यामध्ये रवा मिक्स करून मंद विस्तवावर रवा गुलाबी रंगावर भाजून घ्या किंवा रवा हलका होई परंत भाजून घ्या.
खवा थोडासा परतून घ्या व त्यामध्ये गुलकंद काजू-बदाम घालून मिक्स करून घ्या.
साखरे मध्ये ती पूर्ण भिजेल एव्ह्डे पाणी घालून पाक करायला ठेवा. पाक एक तारी करावा. पाक झालाकी त्यामध्ये रोझ इसेन्स, भाजलेला रवा व किसमिस घालावे. मिक्स करून थंड करायला ठेवावे. दोन-तीन तासांनी त्याचे लाडू वळायला घ्यावेत. लाडू वळताना त्यामध्ये गुलकंदाचे सारण भरावे व छान गोल लाडू वळून घ्यावेत.
The English language version of the Gulkand Ladoo recipe is published in this – Article