कसुरी मेथीची शंकरपाळी (Kasuri Methi Shankarpali ) : कसुरी मेथीचे शंकरपाळे टेस्टी लागतात. आपण मेथीची भाजी बनवतो त्यामुळे तोंडाला छान चव येते. तसेच मेथीचे शंकरपाळे चवीला फार सुंदर लागतात. व हा एक वेगळाच प्रकार आहे. दिवाळीला नक्की बनवा गोड खाल्यावर ही किंचित कडवट टेस्ट फार छान लागते. व तोंडाला छान चवपण येते. कसुरी मेथी ही बाजारात अगदी सहज मिळते. ती बारीक मेथी असते व सुकवून ठेवलेली असते. ही मेथी चवीला उत्कृष्ट लागते व बऱ्याच पदार्थात वापरता येते.
कसुरी मेथीची शंकरपाळी बनवण्यासाठी वेळ: ४० मिनिट
वाढणी: ४ जणांसाठी
साहित्य :
२ कप मैदा (Refined Flour)
१/२ टी स्पून बेकीग पावडर (Baking Powder)
१/२ टी स्पून प्रत्येकी जिरे, ओवा (कुटून) (Cumin Seeds, Ajwain)
१ टे स्पून कसुरी मेथी (सुकवलेला) (Dry Fenugreek Leaves)
१/२ मीठ (Salt)
१/४ कप तेल (कडकडीत) (Vegetable Oil)
तेल शंकरपाळी तळण्यासाठी (Vegetable Oil)
कृती : मैदा, बेकिंग पावडर व मीठ चाळून घ्या. जिरे, ओवा जाडसर कुटून घ्या.
एका परातीत चाळलेला मैदा घेवून त्यामध्ये जिरे, ओवा व कसुरी मेथी घालून मिक्स करून त्यामध्ये कडकडीत तेल घालून पीठ चांगले मिक्स करून घ्या. मग थोडे थोडे पाणी घालून पीठ घट्ट मळून घ्या.
मळलेले पीठ १५-२० मिनिट बाजूला ठेवा मग थोडे कुटून घ्या. त्याचे एक सारखे ३ गोळे बनवून पोळी सारखे लाटून घ्या. मग त्याच्या शंकरपाळ्या लांबट पट्टी सारख्या कापून घ्या.
कढई मध्ये तेल गरम करून शंकरपाळ्या छान कुरकुरीत तळून घ्या.
कसुरी मेथीची शंकरपाळी थंड झाल्यावर प्लास्टिक पिशवीत भरून घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवा.
The English language version of the Kasuri Methi Shankarpali for Diwali Faral is published in this – Article
very helpful post.