कवठाची चटणी : कवठाला इंग्लिश मध्ये (Wood Apple) व हिंदी मध्ये बेल म्हणतात: कवठाची चटणी ही चवीला आंबट-गोड अशी लागते. ही चटणी उपवासाच्या दिवशी सुद्धा करता येते. महाशिवरात्रीच्या उपवासाच्या दिवशी ही चटणी मुद्दाम करतात.आपण नेहमीच नारळाची, पुदिन्याची चटणी बनवतो ही चटणी करून बघा नक्की आवडेल.
कवठाची चटणी बनवण्यासाठी वेळ- २० मिनिट
वाढणी- ४ जणासाठी
साहित्य :
१ कप ताज्या कवठाचा गर (Wood Apple)
१ टी स्पून जिरे पावडर (Cumin Seeds)
१ कप गुळ (Jaggery)
१ टी स्पून लाल मिरची पावडर (Red Chili Powder)
मीठ चवीने (Salt as per taste)
कृती :
कवठ फोडून त्याच्या मधील गर काढून घ्यावा व चमच्यानी चांगला फेटून घ्यावा. जेव्हडा कवठाचा गर असेल तेव्हडा गुळ घ्यावा. जिरे थोडेसे भाजून बारीक करावे. मग कवठाचा गर, जिरे पुड,गुळ, लाल मिरची पावडर, मीठ घालून मिक्स करावे.
लाल मिरची पावडर व जिरे न टाकता सुद्धा ही चटणी छान लागते. गोड हवे असेलतर थोडी साखर मिक्स करा.
The English language version of the Wood Apple Chutney is published in this – Article