कोबीची वडी : बंद गोबी ह्याची वडी अगदी टेस्टी लागते. ही मराठी लोकांची साईड डीश आहे. बनवायला एकदम सोपी आहे व कमी वेळात बनवता येते. कोबीच्या वड्यामध्ये थोडी बडीशेप वापरली आहे त्यामुळे त्याची चव फार छान लागते.
कोबीची वडी बनवायला वेळ : ४० मिनिट
वाढणी : ४ जणांसाठी
साहित्य :
२ कप कोबीचा कीस
१ कप बेसन
१ टी स्पून बडीशेप (कुटून)
१ १/४ टी स्पून लाल मिरची पावडर
१/४ टी स्पून हळद
१/४ टी स्पून हिंग
१ टी स्पून तेल
मीठ चवीने
तेल कोबी वडी तळण्यासाठी
कृती : कोबी किसून धुवून चाळणीवर पाच मिनिट ठेवा म्हणजे पाणी निथळून जाईल.
नंतर चाळणी मधून काढून एका प्लेट मध्ये काढा व त्यामध्ये बेसन, लाल मिरची पावडर, हळद, हिंग, बडीशेप, तेल, मीठ घालून मिक्स करून घ्या. मग एका प्लेटला तेल लावून त्यावर कोबीचे मिश्रण थापा.
कुकरमध्ये थोडे पाणी घालून एका छोटे भांडे कुकरमध्ये ठेवा व त्यावर कोबीचे मिश्रण थापलेली प्लेट ठेवा व दोन-तीन शिट्या काढा. थंड झाल्यावर त्याच्या वड्या कापून कुरकुरीत तळून घ्या.
The English language version of the Cabbage Fritters recipe is published in this – Article
The video in Marathi of this Kobichi Vadi recipe and preparation method can be seen on our YouTube Channel- https://youtu.be/SAd-MI2LiDU