कोथंबीर परोठा (Coriander पराठा) : कोथंबीर परोठा हा नाश्त्याला किंवा मुलांना शाळेत जातांना डब्यात देता येईल व ते अगदी आवडीने खातील. हा परोठा बनवायला अगदी सोपा आहे व लवकर बनण्या सारखा पण आहे. कोथंबीरीचा पराठा चवीला छान व खमंग लागतो.
कोथंबीर पराठा बनवण्यासाठी वेळ : २५ मिनिट
वाढणी : ४ जणांसाठी
साहित्य :
२ कप गव्हाचे पीठ (Wheat Flour)
१/४ कप बेसन (Gram Flour)
१ टे स्पून हिरवी मिरची, आल, लसून पेस्ट (Green Chili, Ginger-Garlic Paste)
१ कप कोथंबीर (Coriander)
मीठ चवीने (Salt as per taste)
१/२ कप ताक (Butter Milk)
तेल धनिया पराठा भाजण्यासाठी (Vegetable Oil)
साजूक तूप किंवा लोणी (Ghee or Butter) वरतून लावण्यासाठी
कृती : गव्हाचे पीठ, बेसन, मिरची,आल-लसूण पेस्ट, कोथंबीर, मीठ, ताक व थोडे पाणी घालून चांगले मळून घ्या. मग एक सारखे गोळे बनवून एक एक गोळा लाटून घ्या.
तवा गरम करून तव्यावर थोडेसे तेल लावा. त्यावर पराठा दोन्ही बाजूनी तेल लावून भाजून घ्या.
गरम गरम कोथंबीर पराठा सर्व्ह करा. सर्व्ह करतांना साजूक तूप किंवा लोणी लावून चटणीबरोबर अथवा लोणच्या बरोबर द्या.
The English language version of the Coriander Paratha is published in this – Article