मोड आलेल्या मसूरची उसळ : मोड आलेल्या धान्याची उसळ ही खूप पौस्टिक असते हे आपल्याला माहीत आहेच. ही एक महाराष्ट्रीयन पद्धतीची उसळ आहे. मोड आलेल्या मसूरची उसळ ही चवीस्ट तर लागतेच व पचायला पण हालकी असते. ह्यामध्ये आले-लसूण व हिरवी मिरची घातली आहे त्यामुळे त्याची चव पण छान लागते.
मुलांना ही उसळ चपाती बरोबर शाळेत जातांना द्यायला फार छान आहे.
मोड आलेल्या मसूरची उसळ बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य :
२ कप मोड आलेले मसूर
२ आमसूल
२ टे स्पून नारळ (खोवलेला)
२ टे स्पून कोथंबीर (चिरून)
फोडणी साठी :
१ टे स्पून तेल
१ टी स्पून मोहरी
१ टी स्पून जिरे
१/४ टी स्पून हिंग
१ छोटा कांदा (चिरून)
१ टे स्पून आले-लसून (चिरून)
१ टे स्पून आले-लसून (बारीक चिरून)
२ हिरव्या मिरच्या (बारीक चिरून)
६-७ कडीपत्ता पाने मीठ चिरून
कृती : एका कढई मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग, कांदा, आले-लसूण, हिरवी मिरची, कडीपत्ता पाने, कांदा घालून एक मिनिट परतून घ्या.
मग त्यामध्ये हळद, मीठ व मोड आलेले मसूर घालून एक कप पाणी घालून कढईवर प्लेट ठेवून त्यावर पाणी घाला व मसूर चांगली शिजवून घ्या. नंतर त्यामध्ये आमसूल घालून मिक्स करा.
नारळाने व कोथंबीर मसूर सजवा व चपाती अथवा भाकरी बरोबर सर्व्ह करा.
The English language version of the Maharashtrian Sprouted Masoor Chi Usal is published in this – Article