टेस्टी खमंग शेव भाजी -Tasty Khamang Sev Bhaji : सेव भाजी ही महाराष्ट्रातील मराठी लोकांची खूप आवडती व लोकप्रिय डीश आहे. घरात कधी भाजी नसेल तेव्हा शेव भाजी ही पटकन होणारी भाजी आहे. तसेच कोणी पाहुणे येणार असतील तर शेव भाजी झटपट बनवता येते. ह्या भाजी मध्ये कांदा, टोमाटो, आले-लसूण वापरले आहे. त्यामुळे भाजी फार छान लागते.
टेस्टी खमंग शेव भाजी बनवण्यासाठी वेळ:४५ मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य :
२ कप जाड तिखट शेव अथवा भावनगरी शेव
१ मोठा कांदा (चिरून)
१ छोटा टोमाटो (चिरून)
१ टी स्पून आले-लसूण पेस्ट
१ टी स्पून लाल मिरची पावडर
१ टी स्पून धने-जिरे पावडर
मीठ चवीने
कोथंबीर
फोडणी साठी
१ टे स्पून तेल
१/४ टी स्पून हिंग
१/४ टी स्पून हळद
कृती : कांदा, आले-लसून पेस्ट, लाल मिरची पावडरघालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. टोमाटो उकडून त्याची प्युरी बनवून घ्या.
एका कढईमधे तेल गरम करून हिंग, कांदा, आले-लसून पेस्ट ४-५ मिनिट परतून घेवून त्यामध्ये टोमाटो प्युरी घालून २-३ मिनिट परतून घ्या. मग हळद, धने-जिरे पावडर, मीठ घालून १ १/२ कप पाणी घालून चांगली उकळी आणा मग त्यामध्ये शेव घालून मिक्स करून २ मिनिट शिजवून घ्या. कोथंबीरीने सजवा.
शेव भाजी गरम-गरम चपाती बरोबर सर्व्ह करा. ही भाजी जास्त वेळ आगोदर करून ठेवू नये. जेवायला बसायच्या वेळेस करावी.
The English language version of the Maharashtrian Style Sev Bhaji is published in this – Article