गव्हाच्या पीठाचे किंवा पीन्नी लाडू (Wheat Flour Ladoo): गव्हाच्या पीठाचे किंवा पीन्नी लाडू हे पौस्टिक लाडू सुद्धा म्हणता येईल. गव्हाच्या पीठाचे लाडू किंवा डिंक लाडू हे महाराष्ट्रातील मराठी लोक बनवतात. पिन्नी लाडू हे नाव पंजाबमध्ये म्हणतात. ह्या लाडू मध्ये गव्हाचे पीठ, सुजुक तूप, डिंक, सुकामेवा, सुके खोबरे, खारीक, खस-खस, जायफळ आहे त्यामुळे हे लाडू पौस्टिक लाडू म्हणता येतील. गव्हाचे लाडू हे दिवाळी फराळाला सुद्धा बनवता येतील. हे लाडू बाळंत झालेल्या बाळंतिनीस द्यायला खूप छान आहेत.
बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: 30 मध्यम लाडू
साहित्य :
२ कप गव्हाचे पीठ (Wheat Flour)
२ कप पिठीसाखर (Powder Sugar)
१/२ कप खायचा डिंक
१ १/२ कप साजूक तूप (Ghee)
१/४ कप खारीक पावडर,
१/२ कप सुके खोबरे (किसलेले) (Dry Coconut)
१ टी स्पून खस-खस (Poppy Seeds)
१/२ टी स्पून जायफळ (Nutmeg)
५-६ बदाम (Almonds)
५-६ काजू (Cashew nuts)
५-६ पिस्ता (Pista)
१ टी स्पून वेलचीपूड (Cardamom Powder)
कृती : कढईमध्ये निम्मे तूप गरम करून त्यामध्ये गव्हाचे पीठ घालून गुलाबी रंगावर भाजून घ्या. डिंक तुपावर तळून घ्या व त्याची पावडर करा. किसलेले खोबरे थोडे भाजून घ्या व हाताने कुस्करून घ्या. खस-खस भाजून घ्या. खारीक पावडर थोडी परतून घ्या. काजू,बदाम, पिस्ता थोडे कुटून घ्या. मग भाजलेल्या पिठात, डिंक, काजू-बदाम पावडर, खारीक पावडर, खस-खस, भजलेले खोबरे, पिठीसाखर, जायफळ पावडर वेलचीपूड घालून मिक्स करा व नंतर थोडे मिश्रण व थोडे तूप घालून चांगले मळून घ्या व त्याचे लाडू बनवा. असे सर्व लाडू बनवून घ्या.
Another version of the Pinni Ladoo is published in this – Article
The English language version of the Wheat Flour Ladoo is published in this – Article