दिवाळीच्या दिवसांमध्ये पूजेची वेळ : आपण सगळे वर्षभर दिवाळीची आतुरतेने वाट बघत असतो. दिवाळी हा महाराष्ट्रातील मराठी लोकांचा सर्वात मोठा व आवडता सण आहे. सगळ्या सणांचा राजा असे दिवाळीला म्हंटले जाते. सगळेजण अगदी लहान मुलांपासून ते आजी आजोबां परंत अगदी आनंदाने दिवाळी साजरी करतात. घराची साफसफाई, रंगरंगोटी, घर सजवणे, नवीन कपड्याची खरेदी, फटाके, दिवाळी फराळ ह्यामध्ये सगळे मग्न झालेले दिसतात.
दिवाळी मध्ये सगळेजण श्रद्धेने देवाची पूजा करतात. दिवाळी मध्ये पाच दिवसाच्या पूजेची वेळ खाली दिलेले आहे.
वसुबारस : वसुबारस हे अश्विन कृष्ण पक्ष एकादशी तिथी ही ७ नोव्हेबर २०१५ शनिवार आहे. ह्या दिवशी गाईची व वासराची पूजा करून त्यांना पुरणपोळीचा व उडदाच्या वड्याचा नेवेद्य खायला देतात. त्यासाठी दुपारी २ नंतर गोमाताची पूजा करू शकता. तसेच आकाश कंदीलाची पूजा करतात.
गुरुद्वादशीला ब्रम्ह पूजा कृष्ण पक्ष द्वादशी ही ८ नोव्हेबर २०१५ रविवार आहे.. ह्या दिवशी ब्रम्ह पूजा करतात म्हणजेच गुरुची पूजा करायची. ती पूजा करायची वेळ आहे दुपारी ४.३२ वाजता.
धनत्रयोदशी– यम दीपदान अश्विन कृष्ण पक्ष त्रयोदश तिथी हे ९ नोव्हेबर २०१५ सोमवार आहे. ह्यादिवशी कुब्र्राचा फोटो व यंत्राची पूजा करतात. सायंकाळी कणकेचा दिवा दक्षिणेला ज्योत करून ठेवतात. ह्यादिवशी नवीन वस्त्र, अलंकार, वह्या खरेदी करतात. ह्या दिवशी पाल दिसणे म्हणजे शुभशकून म्हणतात.
नरकचतुर्दशी (अभ्यंग स्नान) अश्विन कृष्ण पक्ष चतुर्दशी तिथी ही १० नोव्हेबर २०१५ मंगळवार आहे. (अभ्यंग स्नान करण्यासाठी वेळ पहाटे ५.१० ते पहाटे ६.४४ ह्या दिवशी आहे. रात्री ९.२३ ला अमावस्या चालू होते.
लक्षी पूजन : लक्ष्मी पूजन अश्विन कृष्ण पक्ष अमावस्या ही ११ नोव्हेबर २०१५ बुधवार आहे. ह्या दिवशी गणपती, लक्ष्मी, सरस्वती व कुबेर ह्याचे फोटो ठेवून जमा खर्चाच्या वह्या, अलंकार, पेन ह्याची पूजा करतात.
लक्ष्मि पूजन करण्यासाठी वेळ आहे सायंकाळी ६.०० ते ८.३०
इतर शुभ मुहूर्त
सकाळी : ६.३० ते ९.४२
दुपारी : ११.०० ते १२.४२
दुपारी : २.०५ ते रात्री ८.२४
रात्री : ९.२५ ते १२.२५
अमावस्या रात्री ११.१७ परंत आहे किंवा संपणार आहे.
गुडी पाडवा : महासरस्वती पूजा कार्तिक शुक्ल पक्ष प्रतिपदा ११ नोव्हेबर २०१५ गुरुवार आहे.
ह्यादिवशी व्यापारी लोक वह्याची पूजा करतात. ह्या दिवशी एक गंमत आहे. ते म्हणजे महिला आपल्या पती देवाला ओवाळतात. व पती आपल्या अर्धागीनीला काही भेटवस्तू देतात. पूजेची वेळ आहे.
पहाटे : ३.३० ते सकाळी ८.१०
सकाळी : १०.१५ ते दुपारी २.०० परंत
भाऊबीज ही शुक्रवारी आहे. ह्या दिवशी बहीण भावाला औक्षण करते. भाऊ बहिणीला काही भेट वस्तू देतो.