भरलेली मसाला अंडी Bharli Kanda Masala Andi : भरलेली मसाला अंडी ही चपाती बरोबर सर्व्ह करण्यासाठी आहे. भरलेली अंडी ही एक चवीस्ट डीश आहे. बनवायला एकदम सोपी आहे. ह्यामध्ये फक्त कांदा, आले, लसूण,लाल मिरची व थोडासा गरम मसाला वापरला आहे.
थंडीच्या दिवसात अंड्याचे विविध पदार्थ बनवता येतात. तसेच अंडी पौस्टिक तर आहेतच. उकडलेल्या अंड्याची ही डीश आपण करून बघा नक्की आवडेल.
बनवण्यासाठी वेळ : १५ मिनिट
वाढणी : ४ जणांना
साहित्य :
४ उकडलेली अंडी
२ टे स्पून कोथंबीर
२ टे स्पून तेल
४ मोठे कांदे
२ टे स्पून आले-लसूण पेस्ट
२ टी स्पून लाल मिरची पावडर
१/२ टी स्पून हळद
१ टी स्पून गरम मसाला
मीठ चवीने
कृती :
अंडी उकडायला ७-८ मिनिट ठेवा.
कांदा बारीक चिरून घ्या. आले-लसूण पेस्ट बनवून घ्या. कोथंबीर बारीक चिरून घ्या.
एका कढई मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा, आले-लसूण पेस्ट घालून गु;गुलाबी रंगावर परतून घ्या. मग त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला व मीठ घालून दोन मिनिट परतून घ्या.
अंडी उकडल्यावर त्याची टरकले काढून त्याला वरती सुरीने हळुवारपणे उभा व आडवा चीर द्या मग त्यामध्ये १ टी स्पून वरील परतलेला मसाला भरा.
गरम गरम चपाती बरोबर सर्व्ह करा.