हरभरा उसळ : हरभरा उसळ ही खूप चवीस्ट लागते. हरभरा उसळ ही महाराष्ट्रीयन लोकांची आवडती उसळ आहे. ह्यामध्ये हरभरे मोड आलेले वापरायचे. मोड आलेली कडधान्ये खूप पौस्टीक असतात. हे उसळ थोडीसी ओलसर करून व चपाती किंवा भाकरी बरोबर सर्व्ह करायची.
हरभरा उसळ बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य :
२ कप मोड आलेले हरभरे
१ छोटा कांदा (चिरून)
मीठ चवीने
२ आमसूल
१ टे स्पून ओला नारळ (खोवून)
१ टे स्पून कोथंबीर
फोडणी साठी :
१ टे स्पून तेल
१ टी स्पून मोहरी
१ टी स्पून जिरे
५-६ कडीपत्ता पाने
१/४ टी स्पून हिंग
५-६ लसून पाकळ्या (ठेचून)
१/४ टी स्पून हळद
१ टी स्पून लाल मिरची पावडर
१ टी स्पून गरम मसाला
कृती : मोड आलेले हरभरे कुकरमध्ये शिजवून घ्या.
कढईमध्ये तेल गरम करून मोहरी, जिरे, कडीपत्ता, हिंग, लसून घालून कांदा घालून थोडा परतून घ्या.
मग त्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर, गरम मसाला घालून शिजवलेले हरभरे व १/२ कप पाणी घालून ५-७ मिनिट शिजवून घ्या.
नंतर त्यामध्ये ओला खोवलेला नारळ, कोथंबीर, आमसूल घालून एक उकळी आणा.
गरम गरम उसळ भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर सर्व्ह करा.
The English language version recipe of the Sprouted Harbara Usal is published in this – Article