केळीचे शिकरण: मागील लेखामध्ये आपण पाहीलेकी केळ्याचे औषधी गुणधर्म काय आहेत. लहान मुले फळे किंवा केळ खायला कंटाळा करतात. केळ्याचे शिकरण हे झटपट बनवता येते, मुलांना भूक लागलीतर लगेच चपाती बरोबर सर्व्ह करता येते. पिकलेले केळ हे चवीला मधुर, थंड, रुची उत्प्प्न करणारे आहे. दुध व केळे हे लहान मुलांचा पूर्ण आहार आहे. जी मुले अशक्त आहेत त्याच्या साठी केळ्याचे शिकरण हे उत्तम आहे.
काही जणांचा असा समज आहे की संध्याकाळी अथवा रात्री केळे खावू नये पण संध्याकाळी अथवा रात्री केळे जरूर खावे ते तब्येतीला चांगले असते. जुलाब होत असतील तर केळे खाणे अगदी फायद्याचे आहे. आपल्या शरीरातील प्रोटीन ची उणीव केळे व दुध भरून काढते. केळ्याचे शिकरण ही एक स्वीट डीश सुद्धा म्हणता येईल. लहान मुलांना केळ्याचे शिकरण खूप आवडते. व ते पौस्टिक सुद्धा आहे. ह्या बरोबर फक्त चपाती असली तरी चालते.
जर तुम्हाला शिकरणा मध्ये अजून वेगळे बनवायचे असेल तर दुधा आयवजी नारळाचे दुध, साखरे आयवजी गुळ व वेलची पावडर सुद्धा घालून शिकरण छान होते.
बनवण्यासाठी वेळ: १० मिनिट
वाढणी: ४ जण
साहित्य:
६ केळी (पिवळी पिकलेली)
१/२ लिटर दुध
१/४ टी स्पून वेलचीपूड किंवा व्ह्नीला इसेन्स
१/४ कप साखर किंवा गोड हवे असेल तर अजून थोडी
कृती:
चांगली पिकलेली पिवळी केळी घेवून त्याची साले काढून त्याचे लहान-लहान तुकडे कापून घ्या. एका मध्यम आकाराच्या भांडे घेवून त्यामध्ये चिरलेली केळी, दुध, साखर, व वेलचीपूड किंवा व्ह्नीला इसेन्स घालून चांगले मिक्स करा.
गरम-गरम चपाती बरोबर मुलांना केळ्याचे शिकरण सर्व्ह करा.
The English language version of the Kelyache Shikran preparation method is published in this – Article