खमंग चकली : दिवाळी फराळात चकली ही हवीच. ती कशी छान कुरकुरीत करायची ते बघू. ह्या अगोदर आपण चकलीची भाजणी कशी बनवायची ते बघितले. त्या खमंग भाजणी पासून चकली कशी बनवायची ते बघू या
चकल्या बनवायला वेळ २ तास
चकल्या वाढणी (बनतात) : ४०
साहित्य :
४ कप चकली भाजणी –
भाजणी घरी बनवायची असेल तेर – हि पद्धत बघा
१ टे स्पून लाल मिरची पावडर
१ टे स्पून ओवा
३ टे स्पून तीळ
४ टे स्पून तेल किंवा तूप किंवा बटर (कडकडीत)
१ १/2 टी स्पून मीठ
२ कप पाणी (उकळते)
तळण्यासाठी तेल
कृती : भाजणी पीठामध्ये लाल मिरची पावडर, ओवा, तीळ घालून चांगले मिसळून घ्या मग त्यामध्ये कडकडीत मोहन घालून मिक्स करून घ्यावे.
एका मोठ्या भांड्यात २ कप पाणी उकळून घ्या त्यामध्ये मीठ घालून लगेच भाजणीचे पीठ घालून मिक्स करून थोडा वेळ झाकून ठेवा म्हणजे भाजणीचे पीठ चांगले फुगून येईल.
पाण्याचा हात वापरून पीठ चांगले मळून घ्या. मग सोरयाला पाण्याचा व तेलाचा हात लावून पीठ सोरयात भरून प्रथम प्लास्टिक पेपरवर चकली काढून घ्या.
कढई मध्ये तेल चांगले गरम करून चकल्या छान तळून घाव्यात. चकली तळताना थोडी काळजी घ्यायची. तेल चांगले तापले की चकली तेलात सोडतांना विस्तव मोठा ठेवा चकली तेलात सोडली की विस्तव मंद करा व मंद विस्तवावर चकली तळून घ्या.
चकली तळून झाली की घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवावी.
The English language version of the Crisp Maharashtrian Style Chakli is given in this – Article