लाल भोपळ्याचे रायते : रायते अथवा कोशंबीर ही आपल्या जेवणात पाहिजेच. रायते आपण नॉनव्हेज च्या जेवणाच्या वेळीस बनवतो किंवा आपल्याकडे गोडाचे जेवण असते तेव्हासुद्धा बनवतो. रायते नुसते खायला सुद्धा छान लागते. लाल भोपळ्याचे रायते चवीला खूप छान लागते.
साहित्य :
२५० ग्राम लाल भोपळा
२०० ग्राम दही
३ हिरव्या मिरच्या
मीठ व साखर चवीने
१/२ टी स्पून दालचीनी पावडर
फोडणी साठी :
१/२ टे स्पून तेल
१ टी स्पून जिरे
कृती : लाल भोपळा धुवून त्याची साले काढून किसून घ्यावा. मग त्यामध्ये मीठ, साखर, दालचीनी पावडर घालून मिक्स करा.
कढईमधे तेल गरम करून त्यामध्ये जिरे, हिरवी मिरची घालून फोडणी किसलेल्या भोपळ्यावर घालून मिक्स करावे.