मोडाच्या मेथीची उसळ-भाजी: मोडाच्या मेथीची भाजी ही अगदी चवीस्ट व पौस्टिक आहे. ही भाजी बनवतांना मेथीचे दाणे भिजवून मोड आणलेले आहेत. ही मेथीचे दाणे हे वातावर अत्यंत उत्तम आहे. पोटातील वायू, पोट फुगणे हे मेथीमुळे दूर होण्यास मदत होते. ह्या भाजीच्या सेवनाने शरीर सुदृढ बनते. स्त्रियाचा अशक्त पणा दूर होवून त्या सुदृढ बनतात. थंडीमध्ये मेथीची भाजी खाणे हितकारक आहे. त्यामुळे वायूचा त्रास होत नाही. ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांना ही भाजी फार गुणकारी आहे. बाळंत झालेल्या महिलेला ही उसळ देतात.
मोडाच्या मेथीची उसळ-भाजी बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य :
२५० ग्राम (२ कप) मेथी दाणे
२ मोठे कांदे (बारीक चिरून)
१ टी स्पून लाल मिरची पावडर
१/४ कप ओला नारळ (खोवून)
मीठ चवीने
फोडणी साठी
१/२ टे स्पून तेल
१ टी स्पून मोहरी
१/४ टी हिंग
कृती : आपल्याला जर ही भाजी करायची असेल तर तीन (३) दिवस आगोदर मेथीचे दाणे २४ तास भिजत ठेवावे. नंतर दुसऱ्या दिवशी पाणी काढून एका पातळ कापडामध्ये मेथी दाणे घट्ट बांधून ठेवावे. बांधलेली मेथी एका डब्यात ठेवावी व दर २-३ (दोन-तीन) तासांनी त्यावर पाणी शिंपडावे म्हणजे मेथीच्या दाण्यांना छान मोड येतील. मग चौथ्या दिवशी मेथी दाणे कापडातून काढून ते सोलावेत.
एका कढईमध्ये तेल गरम करून मोहरी, हिंग घालून कांदा घालावा व तो गुलाबी रंगावर परतून घ्यावा. मग त्यामध्ये मोड आलेल्या मेथ्या घालून थोडी परतून घ्या. मग त्यामध्ये लाल मिरची पावडर, मीठ, नारळ घालून वाफेवर शिजू द्या.
The English language version of the Fenugreek Seeds Bhaji is published in this – Article