चक्का झटपट कसा बनवावा. चक्का घरच्या घरी कसा बनवावा. महाराष्ट्रात बऱ्याच सणा वाराला श्रीखंड बनवतात. मराठी लोकांची श्रीखंड ही स्वीट डीश फार लोकप्रिय आहे. श्रीखंड पुरी ही डीश फार अप्रतीम लागते.
श्रीखंड हे नुसते खायला पण छान लागते. आपण बाहेरून श्रीखंड आणायचे म्हंटले की खूप महाग पण पडते. श्रीखंड बनवण्यासाठी चक्का लागतो. श्रीखंड बनवायला लागणारा चक्का आपण घरीच बनवला तर ताजा व छान चक्का घरी बनवता येईल. ह्या चक्क्या पासून आपल्याला काही वेगवेगळ्या प्रकारचे श्रीखंड सुद्धा घरी बनवता येतील. चक्का बनवण्यासाठी आपल्याला फक्त एक लिटर म्हशीचे दुध व १/२ टे स्पून ताजे दही लागणार आहे.
साहित्य:
१ लिटर दुध (म्हशीचे)
१/२ टे स्पून दही (ताजे)
१ मलमलचे कापड
चक्का बनवण्यासाठी लागणारा वेळ : ३० मिनिट
वाढणी : एक लिटर दुधामध्ये २५० ग्राम चक्का तयार होतो
कृती:
प्रथम दुध गरम करून घ्यावे. दुध सारखे हलवावे म्हणजे त्यावर मलई येणार नाही. दुध कोमट झाले की त्यामध्ये दही मिक्स करावे व चांगले मिक्स करून भांडे झाकून ठेवावे.
दही जमायला साधारणपणे ७-८ तास लागतात. नंतर एका मलमलच्या कापडामध्ये हे दही घालून ते टांगून ठेवावे म्हणजे त्यातील पाणी निघून जाईल. साधारणपणे दही ४-५ तास तरी टांगून ठेवावे म्हणजे त्यातील जास्तीचे पाणी निघून जाईन. पाच तासानंतर चक्का तयार होईल. मग त्याचे श्रीखंड बनवायचे.
चक्का बनवतांना एक-दोन गोष्टी लक्षात ठेवाव्या. आपण जेव्हा चक्क बनवण्यासाठी दही ४-५ तास टांगून ठेवतो. तेव्हा त्या कापडावर माश्या, चिलटे बसतात त्यामुळे दह्याला वास येवू शकतो. तो येवू नये म्हणून चक्का बाधलेल्या कापडावर प्लास्टिक पिशवी बांधावी म्हणजे त्यावर चिलटे बसणार नाहीत.
The English language version of the Homemade Chakka preparation method is published in this – Article