होममेड पनीर Homemade Paneer घरच्या घरी पनीर कसे बनवावे. पनीरचे बरेच पदार्थ बनवता येतात. आजकाल बाहेर पनीरचे वाढते भाव बघून आपण विचार करतो की पनीर आणावे की नाही. पण मला वाटते आपल्याला घरी छान पनीर बनवता आलेतर बाहेरून पनीर आणायच्या आयवजी आपण घरीच बनवूया. घरी आपल्याला झटपट पनीर बनवता येते. जत आपल्याला सकाळी पनीरचा एखादा पदार्थ बनवायचा आहे तर आपण आदल्या दिवशी रात्रीच पनीर बनवून ठेऊ शकतो.
घरी पनीर कसे बनवायचे त्यासाठी मी स्टेप बाय स्टेप पद्धत दिली आहे. त्यामुळे आपल्याला पनीर बनवतांना अगदी सोपे वाटेल. हे पनीर बनवण्यासाठी पांढरे व्हेनिगर वापरले आहे ते बाजारात सहजपणे उपलब्द होते.
पनीर हे गाईच्या दुधाचे व म्हशीच्या दुधाचे बनवता येते. गाईच्या दुधाचे पनीर हे मिठाई बनवण्यासाठी वापरले जाते. तसेच म्हशीच्या दुधाचे पनीर हे पनीरचे पदार्थ म्हणजे भाजी साठी , भाता साठी, परोठ्या साठी, कबाब करण्या साठी वापरतात कारण की म्हशीच्या दुधाचे पनीर हे घट्ट असते.
बनवण्यासाठी वेळ : १० मिनिट
वाढणी : ३ जणांसाठी
साहित्य :
१/२ लिटर दुध (म्हशीचे)
२ टे स्पून पांढरे व्हेनिगर
एक पांढरे पातळ कापड
चाळणी गळण्यासाठी
कृती : दुघ मंद विस्तवावर गरम करायला ठेवा गरम झाले की त्यामध्ये पांढरे व्हेनिगर अगदी हळूहळू चमच्याने घाला व हळुवारपणे ढवळत रहा. नंतर हळूहळू दुधाचा रंग बदलेल व दुधातील पाणी वेगळे व्हायला लागेल. मग विस्तव बंद करा.
चाळणीवर कपडा घालून त्यावर दुधाचे मिश्रण ओतून त्यावर २-३ ग्लास थंड पाणी ओता. म्हणजे व्हेनिगरचा वास निघून जाईन. त्यातील सर्व पाणी काढून कपड्यातील मिश्रण बांधून तो कपडा २०-२५ मिनिट लटकवून ठेवा.
मग तो कपडा घेवून एक स्टीलची थाळी उलटी करून त्यावर एखादी जड वस्तू म्हणजे वरवंटा किंवा खलबता ४-५ तासा साठी तसाच ठेवावा. म्हणजे पनीर चांगले घट्ट होवून त्याचे तुकडे करता येतील.
नंतर कापडातील पनीर काढून त्याचे हवे तसे तुकडे करावेत.
The English language version of preparing Paneer at home is published in this –Article
The Step By Step Marathi language video for making Homemade Paneer can be seen on our YouTube Channel – https://www.youtube.com/watch?v=3_jroX5WFx0