पनीर ६५ – पनीर ६५ ही डीश साईड डीश म्हणून करता येते. पनीर म्हंटले की सगळ्यांना आवडते. त्याचे बरेच प्रकार करता येतात. आपण पनीरच्या स्वीट डीश करतो. पनीरच्या वेगवेगळ्या भाज्या करतो. पनीर परोठे करतो तसेच पनीरचे स्टारटर सुद्धा बरेच आहेत. पनीर ६५ मध्ये प्रथम पनीर आले-लसून-हिरवी मिरची व दही ह्यामध्ये भिजवून ठेवले आहे मग त्यावर तांदळाच्या पीठाचे आवरण देऊन फ्राय केले आहे. व त्याला परत कडीपत्ता, धने-जिरे घालून परतून घेतले आहे. त्यामुळे ते खूप टेस्टी लागते.
घरी पाहुणे येणार असतील तर ही डीश नक्की बनवा सगळ्यांना आवडेल.
पनीर ६५ बनवण्यासाठी वेळ- ४५ मिनिट
वाढणी- ४ जणांसाठी
साहित्य:
५०० ग्राम पनीर
मसाला लावण्यासाठी
२ टे स्पून आले-लसूण पेस्ट
४ हिरव्या मिरच्या (बारीक चिरून)
१/२ कप दही
२ टी स्पून लाल मिरची पावडर
मीठ चवीने
१/४ कप तेल पनीर परतण्यासाठी
पनीर आवरणासाठी
२ टे स्पून तांदळाचे पीठ
फोडणीसाठी
पनीर परतल्यावर जे तेल राहील ते वापरावे
१०-१२ कडीपत्ता पाने
२ हिरव्या मिरच्या (चिरून)
१ टी स्पून लाल मिरची पावडर
१ टी स्पून धने-जिरेपूड
१/४ कप कोथंबीर पावडर
१/२ टे स्पून लिंबूरस
कृती:
पनीर मसाला: पनीरचे उभे तुकडे करावेत. एका भांड्यात दही, आले-लसूण पेस्ट, हिरव्या मिरच्या, लाल मिरची पावडर, मीठ व पनीर घालून मिक्स करून १५ मिनिट बाजूला ठेवावे. मग त्यावर तांदळाचे पीठ लावून घ्या.
एका नॉनस्टिक भांड्यात तेल गरम करून त्यामध्ये पनीरचे तुकडे गुलाबी रंगावर परतून घेवून बाजूला ठेवा.
त्याच भांड्यात कडीपत्ता, धने-जिरेपूड, हिरवी मिरची, लाल मिरची पावडर घालून परतून घेतलेले पनीर घालून हळुवारपणे परतून घ्या. मग त्यावर कोथंबीर व लिंबूरस घालून मिक्स करून गरम गरम सर्व्ह करा.
The English language vesion of the Paneer 65 recipe is published in this – Article