साट्याच्या नारळाच्या करंज्या – Satyachi Naralachi Karanji or Layered Karanji : साट्याच्या नारळाच्या करंज्या बनवतात पिठाच्या पारीला तांदूळ अथवा कॉर्न फ्लोर व तूप पोळीला लावले जाते. त्यामुळे करंजीला छान पापुद्रे येतात. महाराष्य्रात लग्नाच्या वेळी मुलीला रुखवत द्यायची पद्धत आहे. तेव्हा अश्या प्रकारच्या वेगवेगळ्या रंगामध्ये करंज्या बनवल्या जातात. ह्यामध्ये शाही ओल्या नारळाच्या करंज्या प्रमाणे साहित्य व कृती घ्यायची आहे. फक्त पारी साठी थोडी वेगळी पद्धत आहे.
सारणाची कृती व पारीची कृती शाही ओल्या नारळाच्या करंज्या प्रमाणे आहे ते – इथे बघा
ह्यामध्ये साट्याच्या करंज्या बनतात : ७०
वेळ ३ तास
साहित्य साटा बनवण्यासाठी
६ टे स्पून तूप
६ टे स्पून तांदुळाची पिठी (किंवा कॉर्नफ्लोर)
कृती : तूप व तांदूळाची पिठी एकत्र करून थोडी फेसून घ्यावी. त्याचे एक सारखे सहा भाग करावे.
आता आपली सगळी करंजी बनवायची सगळी तयारी झाली. करंज्या कश्या बनवायच्या ते आपण बघू.
साटा लावायचा असेल तर सहा मोठ्या पोळ्या लाटून घ्याव्यात. एका पोळीला एक भाग साटा लावावा. मग त्यावर दुसरी पोळी ठेवावी त्याला एक भाग साटा लावावा मग तिसरी पोळी त्यावर ठेवावी त्याला तिसरा भाग साटा लावावा नंतर त्याची घट्ट गोल वळकटी करून त्याचे एक इंचचे तुकडे करून भांड्यात झाकून ठेवावे तसेच अजून बाकीच्या तीन पोळ्याचे करावे व त्याच्या सुद्धा लाट्या बनवाव्यात.
करंजी बनवताना एक लाटी घेवून कापलेली बाजू पोलपाटावर घेवून तांदूळ अथवा मैदा वापरून लाटून घ्यावी मग त्यामध्ये एक टे स्पून सारण ठेवून पुरीला कडेनी दुध लावून पुरी मुडपून घ्यावी मग थोडी कडेनी दाबून नक्षीच्या कटरने कापून घ्यावी. अशा थोड्या करंज्या करून ओल्या कापडात ठेवाव्या. (म्हणजे कपडा ओलाकारून घट्ट पिळून घ्या.) म्हणजे करंज्या सुकणार नाहीत.
साटा लावून केलेली कारंजी ही तळताना, कढई मध्ये तूप घेवून चांगले गरम करावे मग करंज्या गुलाबी रंगावर तळून घ्याव्यात. तळून झाल्याकी एका पेपरवर ठेवाव्यात. थंड झाल्यावर मग घट्ट झाकणाच्या डब्यात ठेवाव्यात.
ह्यामध्ये साटा लावून व साटा न लावता करंजी कशी बनवायची ते सांगितले आहे.
टीप लग्नाच्या रुखवता साठी करंजी बनवतांना, पीठ मळताना त्यामध्ये खायचा रंग २ थेंब मिक्स करावा व मग पीठ चांगले मळावे.