सुरणाचे काप : सुरणाचे काप चवीला खूप छान लागतात. ही एक साईड डीश आहे. सुरणाचे प्रकार हे चवीस्ट व रुचकर लागतात. तसेच ते पौस्टिक सुद्धा आहे. सुरणाचे काप बनवतांना सुरण हे फिकट गुलाबी रंगाचे वापरावे. ते खाजरे नसते. फिकट गुलाबी रंगाचे म्हणजे सुरणाचा आतील गराचा भाग फिकट गुलाबी पाहिजे. सुरणाचे काप हे अगदी मटणाच्या कबाब सारखे लागतात.
सुरणाचे काप बनवण्यासाठी वेळ : ३० मिनिट
वाढणी : ४ जणासाठी
साहित्य :
२५० ग्राम सुरण
२ टी स्पून लाल मिरची पावडर
२ टे स्पून व्हेनिगर
१/२ टी स्पून हळद
२ टी स्पून धने-जिरे पावडर
मीठ चवीने
तळायला तेल
कृती : सुरणाची साले काढून त्याचे लांबट थोडेसे जाडसर तुकडे करावे. त्याला मीठ, व्हेनीगर, लाल मिरची पावडर, धने-जिरे पावडर, हळद लावून १५ मिनिट झाकून ठेवा मग तव्यावर थोडे तेल घालून सुरणाचे काप पसरवून ठेवा व मंद विस्तवावर काप दोनी बाजूनी तेल सोडून खरपूस भाजून घ्या.
The English language version of the Suranache Kap recipe is published in this –Article