मलीद्याचा लाडू: मलीद्याचा लाडू म्हणजे चपातीचा लाडू आहे. चपातीचा लाडू हा पौस्टिक आहे. मलीद्याचा लाडू बनवताना चपाती, गुळ, साजूक तूप, काजू, बदाम घालून बनवला आहे. लहान मुलांना दुधा बरोबर किंवा नाश्त्याला किवा शाळेत जातांना डब्यात द्यायला पण खूप छान आहे. पण हा लाडू बनवतांना अगदी ताजी गरम चपाती वापरू नये. चपाती २ तास तरी अगोदर बनवावी म्हणजे लाडू छान होतो.
लाडू बनवण्यासाठी चपाती वापरली आहे त्यामुळे मुलांचे पोट सुद्धा भरते व चपाती बरोबर गुळ, तूप, काजू, बदाम आहे त्यामुळे हे लाडू हेल्थी सुद्धा आहेत. मलीद्याचा लाडू बनवायला अगदी सोपा आहे व कमी वेळात झटपट होतो. कधी आपल्या दुपारच्या जेवणातील चपाती राहिली तर दुपारी दुधा बरोबर हे लाडू बनवून देता येतात.
The English language version of this Ladoo variety can be seen here – Chapati Ladoo
मलीद्याचा लाडू बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट
वाढणी: ४ जणांसाठी
साहित्य:
४ गव्हाच्या चपात्या
१/४ कप गुळ
४ बदाम
४ काजू
१ टे स्पून साजूक तूप
कृती:
गव्हाची चपाती २ तास अगोदर बनवून ठेवावी. मग तिचे तुकडे करून घ्यावे. चपाती मिक्सरमध्ये बारीक करतांना त्यामध्ये काजू, बदाम घालावे थोडेसे मिक्सरमध्ये बारीक करावे.
गुळ किसून घ्यावा. मग मिक्सरमध्ये काढलेली चपाती, गुळ व तूप मिक्स करून घेवून परत थोडे थोडे मिश्रण मिक्सरमध्ये घालून बारीक करावे. सर्व मिश्रण एकदम मिक्सरमध्ये घालू नये. मग त्याचे एकसारखे ४ लाडू बनवावे.
हे लाडू चवीला फार छान लागतात. लहान मुले खूप आवडीने खातात.