क्रीम ऑफ मश्रूम सुप: मश्रूम हे आपल्या परिचयाचे आहेत. तसेच ते पौस्टिकही आहेत. आपण टोमाटो सूप, भाजाच्ये सूप, मक्याच्या कणसाचे सूप बनवतो. तसेच मश्रूमचे सूप हे खूप चवीस्ट लागते. हे सूप बनवतांना ताजे मश्रूम वापरावे म्हणजे सूप चवीस्ट लागते. ह्यामध्ये फक्त कॉर्न फ्लोअर, कांदा, लसूण, मिरे पावडर, व क्रीम वापरल आहे. त्यामुळे ह्याची टेस्ट फार सुंदर लागते. क्रीम ऑफ मश्रूम सुप हे सूप आपण घरी पार्टीला किंवा इतर वेळी सुद्धा बनवू शकतो. थंडीच्या दिवसात तर हे सूप फार छान लागते. लहान मुलांना क्रीम ऑफ मश्रूम सुप नक्की आवडेल. ह्या सूपला अळंबी सूप सुद्धा म्हणता येईल.
क्रीम ऑफ मश्रूम सुप बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट
वाढणी: ४ जणांसाठी
साहित्य:
१ कप मश्रूम (बारीक चिरून)
१ कप मश्रूम (उभे पातळ स्लाईस)
१ मध्यम आकाराचा कांदा
४ लसूण पाकळ्या (बारीक चिरून)
२ टे स्पून कॉर्न फ्लोर
१ टी स्पून मिरे पावडर
१ टे स्पून क्रीम (ताजी साय)
१ टे स्पून बटर
मीठ चवीने
कृती:
मश्रूम चांगले धुवून घ्या. मग चिरून घ्या. कांदा व लसूण बारीक चिरून घ्या. क्रीम फेटून घ्या.
एका कढई मध्ये बटर गरम करून कांदा, लसूण थोडे परतून घ्या. मग त्यामध्ये चिरलेले मश्रूम घालून ४ कप पाणी घालून कढईवर झाकण ठेवून ५-७ मिनिट मंद विस्तवावर शिजू द्या. १/२ कप पाणी व कॉर्न फ्लोर मिक्स करून मश्रूमच्या मिश्रणात घालून, मीठ, मिरे पूड घालून मिक्स करून चांगली उकळी येवू द्या. सर्व्ह करतांना क्रीम घालून मिक्स करून सर्व्ह करा.
गरम गरम क्रीम ऑफ मश्रूम सुप सर्व्ह कराताना वरतून परत मिरे पावडर घाला.