गाजराची वडी-बर्फी: गाजराची वडी ही एक स्वीट डीश आहे. गाजर छान लाल रंगाची घ्यावीत त्यामुळे वडीचा रंग सुद्धा छान येतो. गाजराच्या वड्या बनवायला अगदी सोप्या व झटपट होणाऱ्या आहेत. गाजर तर पौस्टिक तर आहेतच. ह्या वड्या बनवतांना त्यामध्ये दुध व साखर वापरली आहे. पाहिजेतर त्यामध्ये खवा सुद्धा वापरू शकता. खवा वापरला तर छान खुसखुशीत होतात.
The English language version of this recipe can be seen here – Gajar Ki Burfi
गाजर वडी बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ४०-४५ वड्या बनतात
साहित्य:
१ किलो ग्राम लाल गाजर
२ कप दुध
२ कप साखर
१ १/२ टी स्पून वेलचीपूड
४ काजू व ४ बदाम (तुकडे करून)
१ टे स्पून पिठीसाखर
१/२ टे स्पून तूप प्लेटला लावायला
कृती:
गाजर धुवून त्याची साले सोलाण्याने काढून घ्यावीत. मग किसणीने किसून घ्यावीत.
एका कढईमध्ये किसलेली गाजर व दुध मिक्स करून मध्यम विस्तवावर शिजायला ठेवा. दुध आटले साखर घालून मिक्स करून मिश्रण घट्ट होई परंत शिजवून घ्यावे. मग त्यामध्ये पिठीसाखर व वेलचीपूड घालून मिश्रण आळून घ्यावे. मग प्लेटला तूप लावून मिश्रण प्लेटमध्ये एक सारखे थापून घ्यावे. वरतून काजू बदामचे तुकडे घालून सजवावे व थंड झाल्यावर वड्या कापून घ्याव्यात.