झटपट कुरकुरीत मक्याच्या पोह्याचा चिवडा: कुरकुरीत मक्याच्या पोह्याचा चिवडा हा आपण नाश्त्याला किंवा लहान मुलांना डब्यात सुद्धा देता येतो. मक्याच्या पोह्याचा चिवडा हा झटपट व बनवायला अगदी सोपा आहे. ह्यामध्ये पोहे तळून घेवून त्यावर मीठ व लाल मिरची पावडर भुरभुरून घालायची. तसेच तळलेल्या पोह्यावर पिठीसाखर जरा जास्तच भूरभूरायची. कारण लहान मुलांना हा चिवडा थोडा गोडच आवडेल. मक्याचे पोहे हे पौस्टिक तर आहेतच. त्यामुळे मुलांना द्यायला काही हरकत नाही.
मक्याचा चिवडा हा अप्रतीम लागतो. तसेच ह्यामध्ये मसाला नाही त्यामुळे मुलांना द्यायला फार छान आहे.
मक्याच्या पोह्याचा चिवडा बनवण्यासाठी वेळ : २५ मिनिट
वाढणी : ४ जणांसाठी
साहित्य:
२ कप मक्याचे पोहे
१/४ कप शेगदाणे
२ टे स्पून काजू पाकळी
२ टे स्पून बदाम
२ टे स्पून पिठीसाखर
१ टी स्पून लाल मिरची पावडर
मीठ चवीने
तेल मक्याचे पोहे तळण्यासाठी
कृती: एका कढई मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मक्याचे पोहे तळून घ्या व पेपरवर पसरवून ठेवा म्हणजे जास्तीचे तेल पेपरवर निघून जाईन. गरम असतांना वरतून मीठ, लाल मिरची पावडर व पिठीसाखर भूरभुरा व चिवडा चांगला मिक्स करा. नंतर काजू व बदाम तळून मिक्स करा.
The English language of the Corn Poha Chivda is published in this – Article