मुंबई पाव भाजी: पाव भाजी म्हंटले की सगळ्याच्या तोंडाला पाणी येते कारण पाव भाजी ही डीश खूप चवीस्ट आहे. पाव भाजी ही आपल्याला नाश्त्याला, जेवणासाठी, पार्टीला बनवता येते. लहान मुलांच्या वाढदिवसाच्या पार्टीला अथवा महिलाच्या कीटी पार्टीला बनवायला अगदी छान आहे. पाव भाजी ही पौस्टिक आहे कारण ह्यामध्ये बटाटा, कॉलीफ्लॉवर, शिमला मिर्च, टोमाटो, मटर दाणे वापरले आहेत. तसेच ही भाजी बनवायला झटपट आहे व चवीला खूप छान लागते. आपण हॉटेल मध्ये जातो तेव्हा पाव भाजी किती महागात पडते तीच जर आपण घरी बनवली तर लवकर, कमी खर्चात व भरपूर होते. महाराष्ट्रात पण पाव भाजी खूप लोकपिय आहे.
The English language version of the Pav-Bhaji recipe and preparation method can be seen here – Famous Pav-Bhaji
पाव भाजी बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: ४ जणांसाठी
साहित्य:
४ मोठे आकाराचे बटाटे (उकडून, सोलून)
१ कप शिमला मिर्च (बारीक चिरून)
१ कप कॉलीफ्लॉवर (किसून)
१/४ कप मटारचे दाणे
१ कप कोथंबीर (बारीक चिरून)
१ टे स्पून लिंबूरस
१/४ कप बटर
मीठ चवीने
२ लादी पाव
फोडणी साठी
१ टे स्पून तेल
१ मोठा कांदा (बारीक चिरून)
२ मोठे टोमाटो (बारीक चिरून)
१ टे स्पून आले-लसूण पेस्ट
४ मध्यम आकाराच्या हिरव्या मिरच्या (बारीक चिरून)
१/२ टे स्पून लाल मिरची पावडर
१/२ टी स्पून हळद
१ टे स्पून पावभाजी मसाला
कृती:
बटाटे उकडून, सोलून कुस्कुरून घ्या. शिमला मिर्च, कोथंबीर, कांदा, टोमाटो, हिरवी हिरवी मिरची बारीक चिरून घ्या. कॉलीफ्लॉवर किसून धुवून घ्या. मग कॉलीफ्लॉवर व मटारचे दाणे थोडेसे पाणी घालून शिजवून घ्या.
एका कढईमधे तेल गरम करून त्यामध्ये कांदा, टोमाटो, आले-लसूण पेस्ट, हिरवी मिरची व शिमला मिरची घालून ५-७ मिनिट मंद विस्तवावर परतून घ्या. मग त्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर, मीठ घालून मिक्स करून त्यामध्ये कॉलीफ्लॉवर, बटाटे, लिंबू रस व एक ते दीड कप पाणी घालून मग पाव भाजी मसाला, लिंबूरस, थोडी कोथंबीर घालून मिक्स करून चांगल्या दोन वाफा येवू द्या. मग त्यामध्ये एक टे स्पून बटर घालून मिक्स करा.
तवा गरम करून पावाला मधून कापून थोडे बटर लावून पाव चांगले बटर मध्ये गरम करून घ्या.
सर्व्ह करतांना भाजी वर कांदा, टोमाटो व कोथंबीर घाला. भाजी व पाव गरम गरम सर्व्ह करा.