मश्रूम आम्लेट: मश्रूम आम्लेटलाच आपण आळंबीचे आम्लेट म्हणू शकतो. मश्रूममध्ये प्रोटीन असते त्यामुळे ते पौस्टिक आहे. मश्रूमचे आम्लेट हे आपण नाश्त्याला बनवू शकतो. आपण नेहमी अंड्याचे आम्लेट बनवतो. जर त्यामध्ये मश्रूमचे स्टफिंग केले तर त्याची टेस्ट अजून छान लागते. ह्यामध्ये आजीबात मसाला नाही. त्यामुळे लहान मुलांना द्यायला चांगले आहे व ते आवडीने खातील सुद्धा. मश्रूमचे स्टफिंग बनवतांना त्यामध्ये जर गाजर किसून, किवा कांद्याचीपात चिरून घातली तरी छान लागते.
मश्रूम आम्लेट बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट
वाढणी: २ जणासाठी
साहित्य:
सारण भरण्यासाठी:
२ कप मश्रूमचे पातळ पीसेस
१ मोठ्या आकाराचा कांदा
२ टी स्पून सोय सॉस
१ टी स्पून मिरी पावडर
१ टे स्पून तेल
मीठ चवीने
आवरणासाठी:
४ अंडी
१ टे स्पून तेल
मीठ चवीने
सजवण्यासाठी:
मिरी पावडर
कृती:
सारणासाठी अथवा स्टफिंगसाठी:
मश्रूम धुवून त्याचे उभे पातळ काप करून घ्या. कांदा सोलून उभा पातळ चिरा.
एका नॉन स्टिक भांड्यात तेल गरम करून त्यामध्ये कांदा घालून २ मिनिट गुलाबी रंगावर मंद विस्तवावर परतून घ्या. मग त्यामध्ये मश्रूमचे काप घालून दोन मिनिट मंद विस्तवावर परतून घ्या. त्यामध्ये मीठ, मिरे पावडर व सोया सॉस घालून मिक्स करून एक मिनिट परतून घ्या.
प्रथम दोन अंडी एका बाऊल मध्ये फोडून त्यामध्ये मीठ घालून काटे चमच्याने चांगली फेटून घ्या.
नॉन स्टिक तवा गरम करून त्यावर थोडे तेल पसरवून फेटलेले अंड्याचे मिश्रण ओतून एक सारखे पसरवून घ्या. एक मिनिटाने आम्लेट उलटे करून त्यावर मश्रूमचे बनवलेले निम्मे मिश्रण पसरवून घ्या. मग दोन्ही बाजूनी आम्लेट दुमडून घ्या. तसेच दुसरे आम्टेल सुद्धा बनवून घ्या.
गरम गरम मश्रूम आम्लेट सर्व्ह करा. सर्व्ह करतांना त्यावर मिरे पावडरने सजवा.
मश्रूम आम्लेट हे ब्रेड बरोबर किंवा चपाती बरोबर सर्व्ह करा.
The English language version of the same recipe can be seen here – Tasty Mushroom Stuffed Omelette