शाही गाजर हलवा – Shahi Gajar Ka Halwa : महाराष्ट्रीयन शाही गाजर हलवा ही एक स्वीट डीश आहे. सीझनमध्ये किंवा थंडीच्या दिवसात बाजारात छान गाजर मिळतात. गाजरचा हलवा आपण सणावाराला, पार्टीला बनवू शकतो तसेच नाश्त्याला सुद्धा बनवू शकतो. गाजर हे खूप पौस्टिक आहे ते आपल्याला माहीत तर आहेच. गाजर हलवा बनवतांना गाजर तुपामध्ये परतून घेवू नये. हलवा झाल्यानंतर तुपामध्ये परतून घ्यावा. म्हणजे त्याची चव फार छान लागते. असा शाही गाजर हलवा समारंभात बनवला जातो.
शाही गाजर हलवा बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: ४ जणांसाठी
साहित्य:
१/२ किलो ग्राम गाजर (लाल)
१/२ लिटर दुध (क्रीम दुध)
३/४ कप साखर
२ टी स्पून वेलची पूड
२ टे स्पून साजूक तूप
७-८ काजू (तुकडे करून)
७-८ बदाम (तुकडे करून)
१५-२० किसमिस (मनुके)
कृती:
गाजर धुवून सोलाण्यानी त्याची साले काढून घेवून किसून घ्या.
कढई मध्ये दुध गरम करून त्यामध्ये किसलेली गाजरे घालून दुध आटे परंत शिजवून घ्या. दुध आटले की त्यामध्ये साखर व वेलची पूड घालून हलवा थोडा कोरडा करून घ्या. शिजताना हलवा सारखा हलवत रहावा.
दुसऱ्या एका कढईमध्ये तूप गरम करून त्यामध्ये काजू, बदाम तुकडे व मनुके घालून मग त्यामध्ये गाजर हलवा घालून थोडा परतून घ्या. तुपावर परतल्याने हलवा छान खमंग लागतो.
गाजर हलवा जेवण झाल्यावर थोडा गरम करून मग सर्व्ह करावा.
The Marathi language of this Gajar Cha Halwa recipe and preparation method can be seen on our YouTube Channel – https://www.youtube.com/watch?v=3FfAJJ7XlII