स्वीट कॉर्न उपीट-उपमा Sweet Corn Upit-Upma – Makyachya Kanshacha Upma: मक्याच्या कणसांचे उपीट हे नाश्त्याला बनवता येते. स्वीट कॉर्न हे चवीला चांगले लागते. तसेच ते गोड असते व त्याचे बरेच प्रकार बनवता येतात. मक्याच्या कणसाचे उपीट हे लहान मुलांना डब्यात द्यायला चांगले आहे. मक्याचे उपीट हे बनवायला अगदी सोपे आहे व लवकर बनणारे आहे. उपीट बनवतांना फक्त कांदा, हिरवी मिरची, लिंबू, साखर व कोथंबीर वापरले आहे. त्यामुळे ह्याची चव आंबटगोड लागते.
The English language version of this Upma recipe is published here – Tasty Sweet Corn Upma
स्वीट कॉर्न उपीट बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
५ स्वीट कॉर्न (मक्याची कणसे थोडीशी निबर)
१/४ कप कोथंबीर (बारीक चिरून)
१/४ कप नारळ (खोवून)
१ मध्यम आकाराचे लिंबू
मीठ व साखर चवीने
फोडणी साठी:
१ टे स्पून तेल
१ टी स्पून मोहरी१ टी स्पून जिरे
१/४ टी स्पून हिंग
१ मोठा कांदा (चिरून)
४ हिरव्या मिरच्या
८-१० कडीपत्ता पाने
१/४ टी स्पून हळद
कृती:
मक्याची कणसे किसून घ्या. कांदा, कोथंबीर, हिरव्या मिरच्या चिरून घ्या.
एका कढईमधे तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग, कांदा, हिरव्या मिरच्या, कडीपत्ता घालून थोडे परतून घ्या. मग त्यामध्ये हळद, मीठ घालून किसलेली कणसे घालून मिक्स करून घ्या. कढईवर झाकण ठेवून पाच –सात मिनिट शिजू ध्या. झाकण काढून लिंबूरस, कोथंबीर, ओला खोवलेला नारळ, साखर घालून मिक्स करून थोडेसे कोरडे होई परंत शिजू द्या.
गरम गरम सर्व्ह करा. सर्व्ह करतांना वरतून कोथंबीर, नारळ घालून सर्व्ह करा.