मिश्र भाजी: मिश्र भाजी महाराष्ट्रात भोगीच्या दिवशी बनवतात. भोगी म्हणजे संक्रांतजेव्हा असते त्याच्या अगोदरच दिवस म्हणजे भोगी चा दिवस म्हणतात. त्यादिवशी सर्व भाज्या मिक्स करून भाजी बनवतात त्याला मिश्र भाजी किंवा भोगीची भाजी असे म्हणतात. काकडी, दुधीभोपळा, बटाटा, वांगी, दोडका, घेवडा, गाजर वगैरे कोणत्याही भाज्या थोड्या थोड्या घेवून त्याचा लांब लांब फोडी कराव्यात व त्याची भाजी बनवावी. गरम गरम तीळ लावून बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी करून त्याबरोबर ही भाजी सर्व्ह करावी. भोगीची भाजी खूप चवीस्ट लागते.
बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ४ जाणांसाठी
साहित्य:
१/२ वाटी नारळाचा कीस
३ हिरवी मिरची (बारीक करून)
१/२ वाटी दही
१/४ छोटा चमचा हळद
७-८ कडिपत्ता पाने
१ छोटा चमचा चिंचेचा कोळ
२ मोठे चमचे कोथंबीर
मीठ व गुळ चवीनुसार
२ कप पाणी
कृती:
सर्व भाज्या एकत्र करून (अर्धा किलो घाव्या) त्यात पाणी घालून शिजवून घ्या. शिजल्यावर त्या मध्ये चिंचेचा टाकावा व हलवून हळद, मीठ, गुळ घालून १-२ मिनिट शिजवावे.
नंतर खोबरे व मिरची बारीक वाटून ते दह्यामध्ये कालवावे व भाजी खाली उतरवून भाजी मध्ये मिक्स करावे.
गरम गरम भाकरी बरोबर द्यावे.