रॉयल जयपुरी पुलाव – Royal Jaipuri Pulao: आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारचे पुलाव बनवत असतो. जसे मश्रूम पुलाव, सर्व भाज्या घालून पुलाव, अंड्याचा पुलाव, चिकन पुलाव, तसेच रॉयल जयपुरी पुलाव: हा टेस्टी लागतो. ह्या पुलावमध्ये गाजर, कॉलीफ्लावर, मटार, फ्रेंच बीन्स, वापरले आहे. मसाल्यामध्ये कांदा, हिरवी मिरची, मलई, काजू वापरले आहे. त्यामुळे मसालेदार वाटत नाही. पुलाव वरती वरतून पनीर किसून घातले आहे.
The English language version of this recipe is published here – Rich Jaipuri Pulao
रॉयल जयपुरी पुलाव बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिटे
वाढणी: ४ जणांसाठी
साहित्य:
साधा भात बनवण्यासाठी:
२ कप तांदूळ
३ ३/४ कप पाणी
१ टी स्पून तेलमीठ चवीने
पुलाव करीता भाज्या
१/४ कप हिरवे मटार दाणे
१/४ कप गाजर (उभे चिरून)
१/४ कप फ्रेंच बीन्स (उभे चिरून)
१/२ कप कॉली फ्लॉवर (तुरे)
मसाल्या साठी
१/२ कप मलई
८ काजू
२ मोठे कांदे
१/२” आले तुकडा
३ हिरव्या मिरच्या
२ इलायची
१/२ टी स्पून धने-जिरे (पूड)
फोडणी करीता:
२ टे स्पून बटर
२ दालचीनी तुकडे
२ लवंग
३ इलायची
४ काळे मिरे
२ तमलपत्र
७-८ काजू तुकडे
१०-१२ किसमिस
पनीर
कृती:
प्रथम साधा भात बनवून घेण. गाजर उभे चिरून घेणे. फ्रेंच बीन्स उभे चिरून घेणे. मग गाजर, फ्रेंच बीन्स, मटार, कॉली फ्लॉवर थोडे शिजवून घेवून बाजूला ठेवा.
कांदा, मलई, काजू, हिरव्या मिरच्या,इलायची, धने-जिरे पावडर, आले बारीक वाटून घ्या.
कढईमध्ये बटर गरम करून त्यामध्ये दालचीनी, मिरे, तमलपत्र, काजू, किसमिस घालून त्यामध्ये वाटलेला मसाला घालून २-३ मिनिट परतून घ्या. मग त्यामध्ये शिजवलेल्या भाज्या, मीठ, भात घालून मिक्स करून थोडे परतून घ्या.
वरतून किसलेले पनीर घालून गरम गरम सर्व्ह करा.