तिळाच्या वड्या: जानेवारी महिना आला की नव्या वर्षाचे सण सुरु होतात. मकर संक्रांत हा महाराष्टार्तील महिलांचा आवडता सण आहे. संक्रांतीच्या दिवशी महिला पूजा करून हळदी कुंकू करतात. तेव्हा तिळाचे लाडू किंवा तिळाच्या वड्या बनवायची प्रथा आहे. ह्या वड्या खूप छान लागतात.
तिळाच्या वड्या बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: ४० वड्या
The English language version of this recipe can be seen here – Tilachi Vadi for Makar Sankranti
साहित्य:
२ कप तीळ (पांढरे )
१कप दाण्याचा कुट
२ कप पिवळा गुळ
२ मोठे चमचे सुके खोबरे किसून
१ १/२ मोठा चमचा तूप
१ छोटा चमचा वेलची पावडर
कृती:
तीळ खमंग भाजुन घ्यावे व त्याची जाडसर पावडर करावी. सुके खोबरे किसून ठेवावे. दाणे भाजुन त्याचा जाडसर कुट करावा. (तीळ व दाण्याचा कुट एकत्र करावा) १/२ चमचा तूप ताटाला लावून ठेवावे.
गुळ चिरून त्यामध्ये १/४ कप पाणी व १ मोठा चमचा तूप टाकावे व पाक करायला ठेवावा. गुळ विरघळून त्याला बुडबुडे यायला लागले (पाक एक तारी हवा) की कढई खाली उतरून त्यामध्ये तीळ, दाण्याचा कुट व वेलची पावडर टाकून मिश्रण एकत्र करावे. नंतर मिश्रण ताटामध्ये थापावे वरून किसलेले खोबरे थापावे.
थंड झाल्यावर शंकर पाळी सारख्या वड्या पाडाव्या. ह्या वड्या छान लागतात. कडक होत नाहीत.