शाही गाजरची खीर: थंडीच्या सीझनमध्ये छान लाल रंगाची गाजरे मिळतात. गाजरा पासून बरेच पदार्थ बनवता येतात. लाल रंगाची गाजरे ही गुणकारी व गोड असतात. गाजराची कोशंबीर, गाजरचा हलवा गाजराची भाजी तसेच गाजराची खीर पण चवीस्ट लागते. गाजर खाणे हे डोळ्याच्या आरोग्य साठी गुणकारी आहे.
The Marathi language video Easy Nutritious Delicious Gajar (Carrot) Kheer be seen on our YouTube Channel of Easy Nutritious Delicious Gajar (Carrot) Kheer
गाजर खीर बनवतांना मिल्क पावडर वापरली आहे. त्यामुळे थोडा घट्ट पणा येतो. खवा वापरल्यामुळे स्वदिस्ट लागते. कॅंरट खीर ही बनवायला अगदी सोपी आहे व झटपट होणारी आहे. गाजर लाल रंगाचे असते त्यामुळे खिरीचा रंग सुद्धा छान येतो. गाजर खीर ही एक स्वीट डीश आहे. तसेच ती भारतामध्ये खूप लोकप्रिय आहे.
गाजराची खीर बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
१/२ किलोग्राम लाल गाजर
४ कप दुध १ १/२ कप साखर
२ टे स्पून मिल्क पावडर
२ टे स्पून काजू पावडर
१/४ कप खवा
१ टी स्पून वेलचीपूड
काजू, बदाम, पिस्ता तुकडे सजावटीसाठी
कृती: गाजर धुवून सोलून किसून घ्या. दुध गरम करून घ्या मग त्यामध्ये किसलेले गाजर घालून मिक्स करून १०-१२ मिनिट शिजवून घ्या. मग त्यामध्ये मिल्क पावडर, खवा व साखर घालून मिक्स करून घ्या व ५-७ मिनिट मंद विस्तवावर आटवून घ्या. मग त्यामध्ये वेलचीपूड, काजू. बदाम, पिस्ते घालून मिक्स करा.
गरम गरम गाजराची खीर सर्व्ह करा.