तिळगुळाचे लाडू: नवीन वर्ष चालू झालेकी की गृहिणीची धावपळ चालू होते की घर कसे सजवायचे , हळदी-कुंकवाची तयारी करायची, लाडू करायचे की वड्या करायच्या तसेच भोगीची तयारी करायची. सुगडं व पूजेचे साहित्य आणायचे व आपला संसार सुखाचा व संमृधिचा व्हावा म्हणून देवा जवळ प्रार्थना करायची. तिळाचे लाडू हे महाराष्ट्रात फार लोकप्रिय आहेत. तसेच महाराष्ट्रातील महिलांचा संक्रांत हा अगदी आवडतीचा सण आहे. तिळाचे लाडू बनवायला सोपे आहेत. हे लाडू बनवण्यासाठी पांढरे तीळ, शेगदाणे, पंढरपुरी डाळ, खोबरे व गुळ वापरला आहे. त्यामुळे त्याची चव फार छान लागते.
तिळगुळाचे लाडू बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: ३० लाडू
The Marathi language version of this Ladoo recipe can be seen here – Maharashtrian Tilgul Sesame Seeds Ladoo
साहित्य:
२ कप तीळ (पांढरे )
१कप भाजलेले दाणे
१/४ कप पंढरपुरी डाळ (भाजकी)
१/४ कप सुके खोबरे
१ कप चिकीचा गुळ
१ मोठा चमचा साजूक तूप
कृती:
तीळ धुऊन वाळवून खमंग भाजुन घ्यावेत. दाणे भाजुन साले काढून दोन-दोन तुकडे करून घ्यावे. सुके खोबऱ्याचे बारीक तुकडे करून घ्यावे. पाहिजे असल्यास खोबऱ्याला किचित हिरवा रंग लावावा. तीळ, दाणे, व सुके खोबरे एकत्र करावे.
कढाई मध्ये गुळ व तूप घेऊन मंद विस्तवावर पाक करायला ठेवावा. पाक झारीतून खाली करताना धाग्या सारखा निघु लागला की पाक झाला असे समजा मग विस्तव बंद करून तिळाचे मिश्रण एकत्र करून गरम असतानाच लाडू वळवावेत.