बटाटा-चीज सूप: बटाटा-चीज सूप हे एक टेस्टी सूप आहे. लहान मुलांना ते खूप आवडेल. तसेच उकडलेला बटाटा व चीज हे पौस्टिक तर आहेच. बटाटा चीज सूप बनायला अगदी सोपे व झटपट होणारे आहे. हे सूप बनवतांना थोडा मैदा वापरला आहे त्यामुळे सूप घट्ट होऊन दुध खराब होण्याची भीती नसते. चीज घातल्यामुळे त्याची टेस्टपण छान येते. हे सूप बनवतांना फक्त एक काळजी घ्यावी ते सतत ढवळत रहावे म्हणजे खाली भांड्याला चीटकणार नाही.
The English language version of this Soup making method is published here – Healthy and Nutritious Cheese Potato Soup
बटाटा चीज सूप बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
४ मोठे बटाटे
१ मध्यम आकाराचा कांदा
२ चीज क्यूब (किसून)
२ टे स्पून मैदा
मिरे पावडर व मीठ चवीने
२ कप दुध
२ टे स्पून कोथंबीर (चिरून)
कृती:
बटाटे धुवून सोलून त्याचे बारीक तुकडे करावे, कांदा बारीक चिरून घ्यावा, चीज किसून घ्यावे, कोथंबीर चिरून घ्यावी.
कुकरमध्ये २ कप पाणी व बटाट्याचे तुकडे, मीठ घालून तीन शिट्या काढाव्यात. दुधामध्ये मैदा मिक्स करून घ्यावा.
कुकर थंड झाल्यावर उकडलेले बटाटे मिक्सरमध्ये वाटून घेवून मग गाळून घ्यावे. परत कुकर मंद विस्तवावर ठेवून त्यामध्ये मैद्याचे दुध हळूहळू मिक्स करून सारखे हालवत रहावे म्हणजे खाली लागणार नाही. चांगली उकळी आलीकी त्यामध्ये मिरे पावडर व थोडे किसलेले चीज घालून मिक्स करून घ्यावे.
गरमागरम सर्व्ह करा. सर्व्ह करतांना वरतून मिरे पावडर, चीज, कोथंबीर घालून सर्व्ह करावे.