मेथीचे मुठीया: मेथीचे मुठीया ही एक गुजराती पारंपारिक डीश आहे. मेथीचे मुठीया गुजरातमध्ये खूप लोकप्रिय आहेत. पण गुजराती पदार्थ महाराष्ट्रात सुद्धा लोकप्रिय आहेत. मुठीया बनवतांना मेथीची ताजी पाने व भाजणीचा आटा वापरला आहे. ही एक साईड डीश आहे. टोमाटो सॉस बरोबर छान लागते.
The English language version of this recipe can be seen here – Crispy Gujarati Methi Muthia
मेथीचे मुठीया बनवण्यासाठी वेळ: २५ मिनिट
वाढणी: २० मुठीया बनतात.
साहित्य:
१/२ कप मेथीच्या भाजीची पाने
१ कप भाजणीचा आटा (भाजणी घरी कशी बनवायचे ते बघा)
१ टे स्पून आले-लसूण पेस्ट
३-४ हिरव्या मिरच्या (बारीक चिरून)
१ टी स्पून धने-जिरे पावडर
१/४ टी स्पून हिंग
१ टी स्पून हळद पावडर
१ टी स्पून लाल मिरची पावडर
मीठ चवीने
१ टे स्पून गरम तेल (मोहन)
१/४ टी स्पून मेथी दाणे
तेल मुठीया तळायला
कृती:
मेथीची पाने धुवून बारीक चिरून घ्या. मग त्यामध्ये भाजणी आटा, आले-लसूण पेस्ट, हिरव्या मिरच्या, धने-जिरे पावडर, हिंग, हळद पावडर, लाल मिरची पावडर, मीठ घालून मिक्स करून घ्या.
कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मेथी दाणे घालून गरम तेल मिक्स केलेल्या आट्यामध्ये थोडेसे पाणी घालून चांगले मळून घेवून त्याचे एकसारखे २० गोळे बनवा. मग हे गोळे एका चाळणीवर मांडून घ्या.
एका मोठ्या जाड बुडाच्या भांड्यात पाणी गरम करून त्यावर मेथीचे गोळे ठेवलेली चाळणी ठेवून चाळणी स्टीलच्या प्लेटने झाकून घ्या ८-१० मिनिट वाफेवर मुठ्ले शिजवून घ्या.
एका कढईमधे ठेल गरम करून मेथीचे मुठ्ले छान कुरकुरीत तळून घ्या.
गरम गरम मेथी मुठ्ले टोमाटो सॉस बरोबर सर्व्ह करा.