नाचणीची खीर: नाचणीची खीर ही छान टेस्टी लागते. लहान मुलांना ही खीर अगदी फायदेशीर आहे. रागीची खीर ही पौस्टिक तर आहेच ती हेल्दी पण आहे. नाचणीचे आपल्या हेल्थसाठी पण चांगली आहे. तसेच ती पचायला पण हलकी आहे.
लहान मुलांना नाचणीची खीर दुधामध्ये बनवून देतात. त्यामुळे त्याचे पोट सुद्धा भरते व त्याची प्रकृतीपण चांगली राहते.
नाचणी पासून नाचणीचे लाडू, नाचणी खीर, नाचणी उपमा, नाचणी करंजी, नाचणीची भाकरी बनवली जाते. ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यानी नाचणीचा वापर करावा.
नाचणीमध्ये केल्शियम, व्हीटामीन “D” आहे त्यामुळे मुलांची हाडे बळकट होतात. तसेच त्यामध्ये लोह, मिनरल आहे.
ज्यांना डायबीटीस आहे त्याच्या साठी नाचणी चांगली आहे. तसेच रक्तातील कॉलेस्टोरॉल नीट रहातो व हायपरटेन्शन, डिप्रेशन ह्यावर पण उपयोगी आहे.
लहान मुलांना नाचणी खीर खूप पौस्टीक आहे.
नाचणी खीर बनवण्यासाठी वेळ: १० मिनिट
वाढणी: १ कप बनते
साहित्य:
१ टे स्पून नाचणी आटा
१ टी स्पून साजूक तूप
१ कप दुध
१ टे स्पून साखर
१ टी स्पून काजू पावडर
वेलचीपूड चवीने
कृती:
एका भांड्यात तूप गरम करून त्यामध्ये नाचणी आटा घालून दोन मिनिट मंद विस्तवावर परतून घ्यावा.
मग त्यामध्ये एक कप दुध घालून मिक्स करून एक उकळी आणावी. (मिक्स करतांना गुठळ्या रहाता कामा नये)
उकळी आल्यावर त्यामध्ये साखर, वेलची पूड व काजू पूड घालून मिक्स करून परत एक उकळी आणावी.
थोडी गरम असतांना सर्व्ह करावी. ही खीर लहान मुल व मोठे सुद्धा घेवू शकतात. थंडीमध्ये ही खीर घेतल्यामुळे त्याचे अनेक फायदे मिळतात.