हेल्दी पालक इडली: आपण नेहमी इडली बनवतो. लहान मुलांना इडली हा पदार्थ खूप आवडतो. इडली बनवतांना त्यामध्ये थोडे वेगळेपण करता येईल व मुलांना आवडेल सुद्धा. पालक किती पौस्टिक आहे ते आपल्याला माहीत आहेच. मुलांना शाळेत जातांना डब्यात स्पिन्याच इडली देता येईल व अशी रंगीत इडली त्यांना आकर्षक वाटेल व ह्यामध्ये हिरवी मिरची घातल्यामुळे मसालेदार सुद्धा वाटेल. ही इडली बनवतांना हिरवी मिरची घातली आहे त्यामुळे बरोबर चटणी नसेल तरी चालेल. करून बघा. तुम्हाला व तुमच्या लाडक्या मुलांना नक्की आवडेल.
हेल्दी पालक इडली बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: २४ इडल्या बनतात
साहित्य:
इडलीचे पीठ बनवण्यासाठी
१ कप साधे तांदूळ
१/२ कप उडद डाळ
८-१० मेथी दाणे
मीठ चवीने
तेल इडली बनवतांना वापरायला
मिक्स करण्यासाठी:
१/२ कप पालक प्युरी
२-३ हिरव्या मिरच्या
कृती:
तांदूळ व डाळ धुवून घ्या. मग तांदूळ, मेथीदाणे व डाळ वेगवेगळी ७-८ तास भिजत ठेवा. नंतर एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक वाटून घेवून परत १० तास तसेच झाकून ठेवा म्हणजे इडलीचे पीठ चांगले फसफसून येईल.
पालकची पाने धुवून थोडेसे पाणी घालून ५ मिनिट उकडून घ्या. थंड झाल्यावर उकडलेली पाने व हिरवी मिरची मिक्सरमध्ये वाटून घ्या.
इडलीचे पीठ, वाटलेला पालक, मीठ चांगले मिक्स करून घ्या. पीठ जास्त घट्ट झाले असेल तर थोडेसे पाणी घालावे.
इडली पात्रात इडलीचे पीठ घालून १०-१२ मिनिट मोठ्या विस्तवावर इडली वाफवून घ्यावी.
इडली झाल्यावर इडली पत्रातून इडली हळुवारपणे काढावी.