घरच्या घरी चिकन स्टॉक कसा करायचा: चिकनचे अनेक पदार्थ बनवता येतात. चिकन ग्रेव्ही, चिकन बिर्याणी, चिकन सूप तसेच चिकन कॉर्न सूप. चिकन कॉर्न सूप बनवण्यासाठी चिकन स्टॉकची आवशकता लागते. कारण त्याने सुपाला चांगली टेस्ट येते. चिकन स्टॉक हा तब्येतीला चांगला आहे. लहान मुलांना हेल्दी बनवण्यासाठी चिकन स्टॉक काढून देता येतो. तसेच अशक्त माणसाला सुद्धा चिकन स्टॉक काढून देता येतो.
चिकन स्टॉक बनवतांना त्यामध्ये फक्त चिकनचे विंग, मानेचा भाग घातला तरी चालतो. चिकन स्टॉक बनवतांना कांदा, कोथंबीर, मिरी पावडर व मीठ चवीने फक्त घालावयाचे आहे.
चिकन स्टॉक बनवतांना विंग व मानेचा भाग घेतला आहे, चिकन स्टॉक तयार झाल्यावर स्टॉक मधील विंगचे व मानेच्या भागाचे मास काढून सूप मध्ये वापरून क्लीअर सुप म्हणून सुद्धा सर्व्ह करता येते.
The English language version of the Chicken Stock recipe can be seen here- Homemade Chicken Stock
चिकन स्टॉक बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
आता घरच्या घरी चिकन स्टॉक कसा बनवायचा ते बघुया:-
साहित्य:
७-८ पिसेस चिकनचे पंख, मानेचा भाग, पाठीचा भाग
१ मोठ्या आकाराचा कांदा (चिरून)
१ टे स्पून कोथंबीर (चिरून)
१ टी स्पून मिरे पावडर
७-८ कप पाणी
मीठ चवीने
कृती:
चिकनचे तुकडे स्वच्छ धुवून घ्या. एका मोठ्या आकाराच्या भांड्यात ७-८ कप पाणी, चिकनचे तुकडे, कांदा, कोथंबीर, मिरे पावडर, पाणी, मीठ मिक्स करून मंद विस्तवावर चिकनचे तुकडे शिजे परंत ठेवा. चिकन शिजायला १० मिनिट तरी लागेल. शिजल्यावर गाळून घ्या. ह्यालाच चिकन स्टॉक असे म्हणतात.
गरम गरम चिकन स्टॉक सुद्धा गाळून सर्व्ह करता येतो.