काजू-किसमिस पुलाव: काजू किसमिस पुलाव ही एक रॉयल पुलावची डीश आहे कारण ह्यामध्ये काजू-किसमिसचे प्रमाण जास्त वापरले आहे. ह्या भाताची चव अप्रतीम लागते. बनवायला सोपा व लवकर होणारा आहे. ह्या मध्ये दोन अंडी उकडून त्याने भात सजवता येतो पण तुम्हाला आवडत असेल तर वापरावे नाही वापरले तरी भात उत्कृष्ट लागतो.
The English language version of this Pulao recipe is published here – Cashew nuts and Raisins Pulao
काजू-किसमिस पुलाव बनवण्यासाठी वेळ: ३० – मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
२ कप बासमती तांदूळ
१/२ कप काजू
१/२ कप किसमिस
२ मध्यम आकाराचे कांदे
२ अंडी (एछिक)
मीठ चवीने
४ कप पाणी
सजावटीसाठी:
२ टे स्पून काजू
२ टे स्पून किसमिस
१ मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून तळून घ्या.
फोडणीसाठी:
२ टे स्पून तूप
२ तमलपत्र
५-६ मिरे
२ छोटे दालचिनी तुकडे
२-३ हिरवे वेलदोडे
कृती:
तांदूळ धुवून बाजूला ठेवा. कांदा उभा पातळ चिरून घ्या.
कुकरमध्ये तूप गरम करून तमलपत्र, मिरे, दालचीनी व हिरवे वेलदोडे, कांदा घालून दोन-तीन मिनिट परतून घेवून काजू व किसमिस घालून मग धुतलेले तांदूळ व मीठ घालून एक मिनिट परतून घ्या. मग त्यामध्ये गरम पाणी घालून दोन शिट्या काढा.
काजू किसमिस पुलाव सर्व्ह करतांना वरतून तळलेले काजू, किसमिस व तळलेला कांदा घालून सजवून मग सर्व्ह करा.
आवडत असले तर उकडलेले अंडे कापून पुलाव वर सजवा. गरम गरम काजू किसमिस पुलाव टोमाटो सॉस अथवा चिली सॉस बरोबर सर्व्ह करा.